शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत मॅनेजरने घातला हॉटेल व्यावसायिकाला लाखोंचा गंडा, ऑडिटमध्ये उघड झाला घोटाळा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 12:20 IST

हॉटेलची चावी कामगाराकडे देऊन झाला पसार

कणकवली : ज्याच्यावर हॉटेलची संपूर्ण धुरा सोपवली, त्यानेच मालकाच्या विश्वासाला तडा देत लाखोंचा डल्ला मारल्याचा खळबळजनक प्रकार कणकवलीत उघडकीस आला आहे. हॉटेल व्यावसायिक गुरुनाथ दशरथ काळसेकर यांची सुमारे ६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी व्यवस्थापक तुषार नंदकुमार मसूरकर (रा. कलमठ) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सन २०१६ ते २०२५ या प्रदीर्घ कालावधीत हा अपहार सुरू होता.दशरथ काळसेकर यांनी २००९ पासून तुषारला आपल्या बार व बिअर शॉपीचा व्यवस्थापक म्हणून ठेवले होते. बँकेचे व्यवहार आणि माल भरण्याची सर्व जबाबदारी त्याच्याकडे होती. मात्र, नुकत्याच झालेल्या ऑडिटमध्ये हा घोटाळा उघड झाला. बारच्या खात्यातून ६ लाख ५० हजार रुपये फोंडाघाट येथील एका व्यक्तीच्या खात्यावर परस्पर वळवण्यात आले होते. तसेच, तुषारने स्वतःच्या नावावर पिग्मी उघडली असून, त्याचे पैसेही तो बारच्या गल्ल्यातूनच भरत असल्याचे तपासात समोर आले आहे.

ऑडिटमध्ये उडाली झोपसीएकडे हिशोबाची कागदपत्रे तपासणीसाठी दिली असता, फोंडाघाट येथील एका अनोळखी खात्यावर मोठी रक्कम वर्ग झाल्याचे दिसले. चौकशीअंती मॅनेजरनेच हा डल्ला मारल्याचे स्पष्ट झाले.

मॅनेजर झाला 'नॉट रीचेबल'१८ डिसेंबर २०२५ रोजी कोणालाही न सांगता तुषार हॉटेलची चावी कामगाराकडे देऊन पसार झाला. तेव्हापासून त्याचा फोन बंद असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

पोलिसांकडून तपास सुरूमालकाचा डोळा चुकवून दररोज पिग्मीचे पैसे भरणे आणि ऑनलाईन ट्रान्सफरद्वारे रक्कम हडप करणे, असा तुषारचा नित्यक्रम होता. अखेर संशय आल्याने काळसेकर यांनी पोलीस स्थानकात धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश चिकणे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे तालुक्यातील व्यावसायिक वर्गात खळबळ उडाली असून, नोकरांवर विश्वास ठेवावा की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Manager swindles hotel owner of lakhs in Kankavli; scam exposed.

Web Summary : A manager in Kankavli defrauded a hotel owner of ₹6.5 lakhs over nine years. The fraud was discovered during an audit, revealing unauthorized transfers and Pigmy account payments using bar funds. The manager is now absconding, and police are investigating.