शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

महाराष्ट्र स्वाभिमान राज्यातील निवडणूका लढवणार : नारायण राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 5:28 PM

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष राज्यातील विधानसभा व लोकसभेच्या निवडणूका लढविणार असल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री तथा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी कुडाळ येथे केली.

ठळक मुद्देमहाराष्ट्र स्वाभिमान राज्यातील निवडणूका लढवणार : नारायण राणे दीपक केसरकर फक्त बढाया मारतात

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष राज्यातील विधानसभा व लोकसभेच्या निवडणूका लढविणार असल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री तथा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी कुडाळ येथे केली.

सिंधुदुर्गच्या विकासासाठी जागतिक स्तरावरील प्रकल्प आपण आणले. मात्र गेल्या चार वर्षात एकही प्रकल्प पालकमंत्र्यांना पूर्ण करता आला नाही हे दुर्दैव आहे. त्यांच्यामुळे जिल्ह्याचा विकास खुंटला असून, वीस वर्षांनी जिल्हा मागे गेला आहे, अशी जोरदार टिका त्यांनी कुडाळ येथे  केली.राणे म्हणाले, आगामी लोकसभा व विधानसभेच्या या जिल्ह्यातील सर्व जागा स्वाभिमान पक्षाच्यावतीने लढवून या चारही जागा जिंकणार आहे. तसेच राज्यात पक्षाच्यावतीने निवडणूक लढविल्या जाणाऱ्या जागा निवडणूका जवळ आल्यावर जाहीर करणार आहे.यावेळी राणे यांनी सांगितले की, या जिल्हाचा विकास व्हावा या दृष्टीने या जिल्ह्यात अनेक प्रकल्प आणले. मात्र चार वर्षे पूर्ण करणाऱ्या सरकारला व येथील दुर्दैवी पालकमंत्र्यांना एकही प्रकल्प पूर्ण करता आला नसल्याने या चार वर्षात या जिल्ह्याचा विकास पुर्णपणे ठप्प झालेला असून विकासाच्या बाबतीत हा जिल्हा पूर्णपणे मागे गेला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

जिल्ह्याच्या विकासासाठी दरवर्षी नवीन प्रकल्प जिल्ह्यात येणे गरजेचे आहे. पण जुने प्रकल्प पूर्ण नसून आताच्या पालकमंत्र्यांना एक नवीन प्रकल्प आणता आला नाही, असा टोलाही त्यांनी केसरकरांना लगावला.महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. मात्र अनेक ठिकाणी महामार्गावर खड्डे पडले असून या महामार्गाची दुरूस्ती करण्याबाबत ठेकेदारांशी बोललो असून येत्या दोन दिवसात दुरूस्ती न झाल्यास मंत्र्यांशी याबाबत भेटेन, अन्यथा पक्षाच्यावतीने महामार्ग बंद आंदोलन करू असाही इशारा त्यांनी यावेळी दिला.यावेळी स्वाभिमानचे जिल्हाधक्ष दत्ता सामंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, विकास कुडाळकर, जिल्हा बँक संचालक सतीश सावंत, जिल्हा परिषद उपाधक्ष रणजित देसाई, कुडाळ तालुकाध्यक्ष दीपक नारकर, नगराध्यक्ष विनायक राणे, संदीप कुडतरकर, विशाल परब उपस्थित होते.जिल्ह्यात अनैतिक धंदे व भ्रष्टाचाराची वाढया चार वर्षात जिल्ह्याचा विकास पुर्णपणे ठप्प असून रेशनवर धान्य नाही. जनतेची कामे होत नसून या उलट अनैतिक धंदे व भ्रष्टाचाराचे प्रमाण या जिल्ह्यात वाढत आहे. जिल्ह्यात अधिकाऱ्यांची दादागिरी वाढत असून त्यांच्यावर पालकमंत्री व सत्ताधारी आमदार यांचा वचक नसून अधिकारी त्यांची दखल घेत नसल्याचा टोलाही राणे यांनी यावेळी लगावला.दोन दिवसात केसरकरांना नोटीस पाठविणारजिल्ह्यातील रूग्णांना माफक व दर्जेदार सेवा देता यावी या उद्देशाने पडवे येथे लाईफटाईम हे हॉस्पीटल सुरू केले असून केसरकर हे जलसीने, आकसाने व दृष्टबुध्दीने हॉस्पीटलची बदनामी करीत असून त्यांची ही बदनामी मी सहन करणार नाही. बदनामीप्रकरणी येत्या दोन दिवसात त्यांना वकीलामार्फत कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचे राणे यांनी जाहीर केले. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे sindhudurgसिंधुदुर्ग