शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'होय मी रस्त्यानेच आलो, रस्त्यानेच जातोय, 'कोकण दरोडेखोरांच्या हातात द्यायचं का?' उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना डिवचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 16:00 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार नारायण राणे यांच्यावर टीका केली.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) :  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात प्रचारसभांना सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या आज कोकणात सभा आहेत. ठाकरे यांनी आज कोकणातील पहिल्याच सभेत खासदार नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला. काही दिवसापूर्वी खासदार राणे यांनी कोकणात येताना हेलिकॉप्टरने नको, रस्त्याने या',अशी टीका केली होती. या टीकेला आज उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले. 

'पवारांनी शिवसेना फोडली'; छगन भुजबळांच्या आरोपावर शरद पवारांनी सोडलं मौन, काय दिलं उत्तर?

सिंधुदुर्ग येथील जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आपलं सरकार आल्यानंतर बऱ्याच गोष्टी करणार आहे. आज यांनी महिलांबाबत घोषणा केल्या आहेत. मोदीजी तुम्ही १५ लाख देणार होता मग १५०० का देत आहे?, असा सवालही ठाकरेंनी केला. आता यांच्या योजना येत आहेत. आजपर्यंत भाव फक्त गद्दारांनाच होता. तुम्हाला आम्हाला नव्हता, लोकसभा निवडणुकीत यांना फटका दिल्यानंतर यांना लाडकी बहीण आठवली, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर केली. 

"मला मध्ये कोणीतरी आव्हान दिले की हेलिकॉप्टरने येऊ नका, रस्त्याने या. होय मी रस्त्यानेच येतो आणि रस्त्यानेच जातोय, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी खासदार नारायण राणे यांचे नाव न घेता केली. पुतळा पडल्यानंतर ही शिवदृोही माणस आदित्य ठाकरे आणि तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर बाहेर ठणाणा करत बसली होती. ही लोक शिवद्रोही, महाराष्ट्रद्रोही आहेत, असंही ठाकरे म्हणाले. आमच्यावर आरोप करा ते राजकारण आहे. पण तुमची काळीकृती ती आजपर्यंत खूप झाली. गेल्यावेळी यांचे घोडे गंगेत नाहले, पण ही चूक पुन्हा करु नका, असंही ठाकरे म्हणाले. 

बंडखोरी ही महाराष्ट्रासोबत गद्दारी आहे

ठाकरे म्हणाले, काहीजण बंडखोरी करत आहेत. ती बंडखोरी नाही, ती महाराष्ट्रासोबत केलेली गद्दारी आहे. जे कोणी बंडखोर आहेत त्यांनी हे पाप करु नये. व्यक्तिगत स्वप्नासाठी बंडखोरी करु नका. बंडखोरी म्हणजे महाराष्ट्रासोबत केलेली गद्दारी आहे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

दीपक केसरकरांवर निशाणा

उद्धव ठाकरे म्हणाले, दीपक केसरकर तर खाली मुंडी आणि पातळधुंडी आहे. २०१४ मध्ये चांगला माणूस म्हणून आव आणला होता. मोदी स्वतः या ठिकाणी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी आले मात्र ते निवडणुकीसाठी होतं, दाढीवाला म्हणाले पुतळा वाऱ्याने कोसळला, केसरकर पुतळा कोसळला चांगलं झालं म्हणाले, मात्र केसरकर पडल्यानंतर महाराजांचा चांगला पुतळा होईल, अशी टीकाही ठाकरे यांनी केली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sindhudurgसिंधुदुर्गbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNarayan Raneनारायण राणे