शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "राणे कुटुंबीयांचा त्रास, लोकसभा, विधानसभा...";राजन तेलींनी आरोप करत घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 10:22 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे. तर दुसरीकडे कोकणात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार राजन तेली यांनी भाजपाला राजीनामा दिला आहे. राजीनामामध्ये त्यांनी खासदार नारायण राणे यांच्यावर आरोप केले आहेत. तसेच पक्ष सोडण्यामागची कारणही सांगितली आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. 

दरम्यान, आता दोन दिवसात राजन तेली शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. माजी आमदार राजन तेली यांनी भाजपाला दिलेले राजीनामा पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या पत्रात त्यांनी राणे कुटुंबीयांवर आरोप केले आहेत. 

मविआचा फॉर्म्युला १००-८०-८०...; दोन दिवसांत तोडगा काढून जागावाटप जाहीर करणार, 'या' एका गोष्टीवर एकमत नाही!

या पत्रात राजन तेली यांनी म्हटले आहे की, एकाच कुटुंबाला एक लोकसभा दोन विधानसभा आणि त्यांच्याच कलेने तिसरी विधानसभा उमेदवारी देणे मला योग्य वाटत नाही. घराणेशाही मला मान्य नाही. राणे कुटुंबीयांकडून होत असलेल्या खच्चीकरणामुळे आपण भाजप सोडत असल्याचा दावा तेली यांनी पत्रातून केला आहे. माजी आमदार राजन तेली ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच येणारी विधानसभा निवडणूक ते लढणार असल्याचे बोलले जात आहे. आज शुक्रवारी  १८ ऑक्टोंबर रोजी ते पक्षात प्रवेश करणार असून तत्पूर्वी त्यांनी भाजप सदस्यत्वाचा तसेच विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा भाजपच्या वरिष्ठांकडे दिला आहे.

पत्रात नेमकं काय?

'आपण पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केला. परंतु राणे कुटुंबियांकडून तसेच पक्षांतर विरोधकांकडून आपल्यावर वारंवार अन्याय करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे आपण हा निर्णय घेत आहे, बांदा शहरापुरती मर्यादीत असलेली भाजप संघटना आपण वाढवली जिल्हाभरात ताकद निर्माण केली.शंभर टक्के प्रामाणिकपणे काम केले स्वतःच्या मेहनतीने माणसे जोडली. परंतु आयत्यावेळी मात्र त्या ठिकाणी माझे खच्चीकरण करण्यात आले. मागच्या वेळी संधी असताना सुद्धा त्या ठिकाणी उमेदवारी मी भरू शकलो नाही केवळ पक्ष नेतृत्वाने आदेश दिल्यामुळे हातात एबी फॉर्म असताना सुद्धा आपण अपक्ष उमेदवारी भरण्याचा  निर्णय घेतला, असंही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

 '२०१९ मध्ये झालेल्या जिल्हा बँकेच्या तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये माझा पराभव करण्यासाठी पक्षांतर्गत विरोधक निर्माण करणे यासाठी साम-दाम-दंड-भेद याचा वापर करणे असा प्रकार घडला. पूर्वीच्या या सर्व त्रासाला कंटाळून मी भाजप पक्षात प्रवेश करून पक्ष संघटना वाढीसाठी काम केले, परंतु भाजपात दाखल झालेल्या नारायण राणे कुटुंबीयांकडून पुन्हा माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला. मी कुडाळ तालुक्यातील घोडगे सारख्या अत्यंत ग्रामीण भागात सामान्य कुटुंबात जन्मलो आहे. कष्ट करून माझी राजकीय कारकीर्द निर्माण केली आहे. ज्या पक्षात गेलो त्या ठिकाणी शंभर टक्के प्रामाणिक काम केले आहे. स्वतःच्या मेहनतीने माणसे जोडली आहे.

दरम्यानच्या काळात झालेले खच्चीकरण लक्षात घेता झालेल्या सर्व प्रकार व घटना सातत्याने वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिल्या. मात्र त्यावर कोणती कारवाई झाली नाही. त्यामुळे वरिष्ठांचा नाईलाज असू शकतो हे मी समजू शकतो, असंही माजी आमदार राजन तेली यांनी म्हटले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाNarayan Raneनारायण राणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस