शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

Vidhan Sabha 2019: तुम्ही बोलत राहा, तुमच्या बोलण्यामध्येच आमचा फायदा, नितेश राणेंचा केसरकरांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 10:50 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - केसरकर आणि राणे यांच्यातील वाकयुद्धामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी सिंधुदुर्गात पुन्हा एकदा राणे-केसरकर वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 

ठळक मुद्देसिंधुदुर्गात पुन्हा एकदा राणे-केसरकर वादाला तोंड फुटले

सिंधुदुर्ग - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या संभाव्य भाजपा प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर भाजपाने कणकवलीतून नितेश राणे यांना उमेदवारी दिल्यास शिवसेना कणकवलीत उमेदवार उभा करेल, असा इशारा शिवसेना नेते आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिला होता. आता नितेश राणे यांनी त्यांना आव्हान दिले असून, तुम्ही बोलत राहा, तुमच्या बोलण्यामध्ये आमचा फायदा आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी सिंधुदुर्गात पुन्हा एकदा राणे-केसरकर वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूक महिन्याभरावर आली तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. माजी मुख्यमंत्री नारायण राणेंच्या भाजपाप्रवेशाबाबत असलेल्या संभ्रमामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, नारायण राणे यांनी महाजनादेश यात्रेदरम्यान, मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आपण मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात भाजपामध्ये प्रवेश करणार असून, कणकवलीमधून नितेश राणे हे भाजपाकडून निवडणूक लढवतील, असे नारायण राणे यांनी जाहीर केले होते. त्यानंतर दीपक केसरकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपाने नितेश राणेंना कणकवलीतून उमेदवारी दिल्यास शिवसेना त्यांच्याविरोधात उमेदवार उभा करेल, असा इशारा दिला होता. तसेच मुख्यमंत्र्यांनी नारायण राणेंना व्यासपीठावर घेतले नाही. याचा अर्थ भाजपाला राणेंना आपल्या पक्षात घ्यायचे नाही, असा टोलाही त्यांनी लगावला होता. त्यानंतर नितेश राणेंनी ट्विट करून नितेश राणेंवर पलटवार केला आहे.  ''माननीय केसरकरजी तुम्ही बोलत राहा, तुमच्या बोलण्यामध्येच आमचा फायदा आहे. लगे रहो,'' असा टोला त्यांनी केसरकर यांना लगावला.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nitesh Raneनीतेश राणे Deepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्गkankavli-acकंकवली