महाराष्ट्र विधान मंडळ अंदाज समितीचा सिंधुदुर्ग दौरा सोमवारपासून

By Admin | Updated: April 22, 2017 13:48 IST2017-04-22T13:48:24+5:302017-04-22T13:48:24+5:30

अधिकाऱ्यांची घेणार बैठक

Maharashtra Legislative Assembly's estimation committee will visit Sindhudurg from Monday | महाराष्ट्र विधान मंडळ अंदाज समितीचा सिंधुदुर्ग दौरा सोमवारपासून

महाराष्ट्र विधान मंडळ अंदाज समितीचा सिंधुदुर्ग दौरा सोमवारपासून

आॅनलाईन लोकमत

सिंधुदुर्गनगरी, दि. २१ : महाराष्ट्र विधान मंडळ अंदाज समिती सोमवार दिनांक २४ एप्रिल रोजी जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे.
सोमवार, दिनांक २४ एप्रिल २0१७ रोजी सकाळी 0९.00 वाजता शासकीय विश्रामगृह सावंतवाडी येथे आगमन. सकाळी ९.३0 ते १0.३0 वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गृह (बंदरे) विभाग, मत्स्य व्यवसाय विभाग, पर्यटन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग, फलोत्पादन विभाग आणि औद्योगिक वसाहतींच्या प्रकल्प कामांकडे प्रयाण. सकाळी १0.३0 ते दुपारी २.00 वाजता प्रकल्प व विकास कामांना भेटी देणार आहेत.

दुपारी २.00 ते ३.00 राखीव. दुपारी ३.00 ते सायंकाळी ५.00 वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गृह (बंदरे) विभाग, मत्स्य व्यवसाय विभाग, पर्यटन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग, फलोत्पादन विभागआणि औद्योगिक वसाहतींच्या उर्वरित प्रकल्प कामांस भेट व पाहणी.

सायंकाळी ५.00 ते ७.00 वाजता समितीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिलेल्या भेटी व पाहणीच्या वेळी आढळून आलेल्या बाबींच्या संदर्भात तसेच लेखी स्वरुपात प्राप्त झालेल्या माहितीच्या अनुषंगाने संबधित अधिकारी यांच्या समवेत ओरोस (बुद्रुक) येथे बैठक. सायंकाळी ७.00 वाजता शासकीय विश्रामगृह गणपतीपुळेकडे प्रयाण असा कार्यक्रम निश्चित केला आहे.

Web Title: Maharashtra Legislative Assembly's estimation committee will visit Sindhudurg from Monday