शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

Maharashtra Election 2019 : कोकणात भाजपा हा नंबर एकचा पक्ष बनवू- नितेश राणे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 13:31 IST

नारायण राणे यांचे सुपुत्र आणि पूर्वाश्रमीचे काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

कणकवलीः नारायण राणे यांचे सुपुत्र आणि पूर्वाश्रमीचे काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. कणकवली इथल्या भाजपा कार्यालयात भाजपाचे नेते अतुल काळसेकर, प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत नितेश राणे कार्यकर्त्यांसह भाजपात दाखल झाले असून, ते कणकवली मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कार्यकर्त्यांना संबोधित करताना अतुल काळसेकर म्हणाले, भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्ह्याची एक वेगळी परंपरा आहे. 2004साली अजित गोगटे आमदार झाले. 2009लाच त्यांनी सांगितलं की, मी एक टर्मच आमदार राहणार असून, माझ्यानंतर प्रमोद जठार आमदार होतील. या प्रवेशाच्या निमित्तानं मला पुन्हा एकदा अभिमान वाटतो. प्रमोद जठार यांनी स्वतःला मिळणारी आमदारकीची निवडणूक लढणार नसल्याचं सांगितले आहे. तसेच या मतदारसंघाचे आमदार नितेश राणे हे भाजपकडून निवडणूक लढवणार आहेत. नितेश राणेंचे कार्यकर्ते आणि भाजपाचे कार्यकर्ते एकत्र निवडणुकीत सामोरे जातील, असंही काळसेकर म्हणाले आहेत.नितेश राणे म्हणाले, देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि नारायण राणेंचे मी आभार व्यक्त करतो. सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष जठार, अतुल काळसेकर यांच्यासमोर सांगतो की, आजपासून या पक्षाला कोकणता नाही, तर महाराष्ट्रात ताकदवान बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. कोकणात भाजपा हा एक नंबरचा पक्ष राहील, यासाठी आम्ही प्रयत्न करू. आम्ही पक्षामध्ये नवीन असलो तरी आम्ही सगळ्यांचा मान राखू, भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या शब्दांचं पालन केलं जाईल, भाजपाचे प्रत्येक आदेश पाळणार असून, पक्षाला मोठं करण्यासाठी लागणारं सगळं योगदान देऊ, असंही नितेश राणे म्हणाले आहेत. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019