शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : कणकवलीत नितेश राणे पुन्हा मिळवणार का विजय? 

By वैभव देसाई | Updated: October 5, 2019 06:05 IST

नितेश राणेंना भाजपाकडून एबी फॉर्म मिळाल्याने ते पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याचे निश्चित झाले.

- वैभव देसाईकणकवली : नारायण राणे यांचा भाजप प्रवेश झाला नसला तरी राणेंचे पुत्र नितेश राणेंना भाजपने कणकवलीतून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे तळकोकणातील राजकारणात वेगळीच रंगत आली आहे. भाजपच्या प्रमोद जठार यांनी माघार घेत आमदारकीसाठी नितेश राणेंचे नाव पुढे केल्याचे भाजप नेते अतुल काळसेकरांनी पत्रकार परिषदेत सांगितले. एकंदरीतच भाजपने टाकलेल्या या गुगलीने कणकवली मतदारसंघात इच्छुक असलेले संदेश पारकर आणि अतुल रावराणे यांचा हिरमोड झाला. नितेश राणेंना भाजपाकडून एबी फॉर्म मिळाल्याने ते पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याचे निश्चित झाले.मात्र मतदारसंघातील भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते त्यांच्याविरोधात एकवटल्याचे चित्र आहे. भाजप नेतृत्वाच्या निर्णयाविरोधात बंडाचा झेंडा फडकावत आम्ही कोणत्याही परिस्थितीत नितेश राणेंचे काम करणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. मात्र नारायण राणेंनी स्वत:चापक्ष भाजपामध्ये विलीन केल्यानंतर ती सर्व ताकद पक्षाला मिळेल, हा हिशेब वरिष्ठ नेत्यांनी केला आहे. नारायण राणेंना पक्षात घेऊन भाजप त्यांचा शिवसेनेविरोधात अस्त्रासारखाच वापर करेल, अशी चर्चा आहे.कोकणात भाजपाला शिवसेनेमुळे ताकद वाढवता आलेली नाही. कोकणात होऊ घातलेल्या प्रकल्पांसाठी भाजपाला तिथे आपले आमदार हवे आहेत, प्रत्येक वेळी शिवसेनेच्या दबावापुढे झुकणे भाजपाच्या फारसे पचनी पडत नाही. नितेश राणेंना भाजपाकडून मिळालेली उमेदवारी शिवसेना नेत्यांना आवडलेली नाही. राणेंचे एकेकाळचे जुने सहकारी असलेले सतीश सावंतही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. ती त्यांनी मिळवली. त्यामुळे राणे आणि त्यांचा समर्थक अशी ही लढत आहे. त्यात मतदार कोणाला कौल देतो, याकडे तळकोकणातील पुढील राजकारण ठरेल.सिंधुदुर्गात तीन जागांसाठी ५१ अर्ज दाखलविधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन जागांसाठी एकुण ५१ अर्ज दाखल झाले आहेत. यात कणकवली मतदार संघात ८ उमेदवारांनी १५, कुडाळमध्ये १0 जणांनी १५ तर सावंतवाडीमध्ये १२ जणांनी २१ अर्ज दाखल केले आहेत. महायुतीमध्ये भाजपाच्या वाट्याला आलेल्या कणकवली मतदार संघात शिवसेनेने ए. बी. फॉर्म धरून अधिकृत उमेदवार दिल्याने महायुतीला तडा गेला आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून जर सतीश सावंत यांनी शिवसेनेकडून आपला अर्ज कायम ठेवला तर जिल्ह्यात युतीचे नियमोल्लंघन ठरेल.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे kankavli-acकणकवली