शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : चार हाडांचा बीएमसी चोर; निलेश राणेंची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 09:56 IST

कणकवली विधानसभा मतदारसंघात झालेल्या प्रचारसभेवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेली टीका राणे कुटुंबीयांना जिव्हारी लागली आहे.

कणकवली/मुंबई - कणकवली मतदारसंघात झालेल्या प्रचारसभेवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेली टीका राणे कुटुंबीयांना जिव्हारी लागली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या टीकेला नारायण राणे किंवा त्यांच्या दोन्ही सुपुत्रांनी कुठलेली थेट प्रत्युत्तर दिलेले नाही. मात्र चार हाडांचा बीएमसी चोर आणज कोकणात  आला होता आणि परत गेला. बाकीचं लवकरच बोलू, असा टोला माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंचे नाव द घेता लगावला आहे.  

नारायण राणेंचे सुपुत्र नितेश राणे यांना भाजपाने कणकवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यानंतर शिवसेनेने त्यांच्या उमेदवारीला आव्हान देत सतीश सावंत यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यामुळे कोकणात पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध नारायण राणे असा वाद पेटला आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी कणकवलीत झालेल्या प्रचारसभेमध्ये नारायण राणे आणि कुटुंबीयांवर जोरदार टीका केली होती. ''राणे जिथे जातील त्या पक्षाची वाट लावतील. करून करून भागले आणि देवपूजेला लागले, अशी त्यांची अवस्था झाली आहे. शिवसेनेत होते त्यांना काढलं, काँग्रेसमध्ये होते त्यांना काढलं, आता शेवटचा पर्याय आहे, हा लढा सुसंस्कृत विरुद्ध खुनशी प्रवृती असा आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. दरम्यान, शिवसेनेकडून कितीही टीका झाली तरी त्याला प्रत्युत्तर दिले जाणार नाही असा पावित्रा नारायण राणे आणि नितेश राणे यांनी घेतला होता. मात्र बुधवारी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेनंतर नारायण राणेंनेही शिवसेनेला इशारा दिला आहे. आम्ही कुणाचाही हिशेब बाकी ठेवत नाही, असे सांगत त्यांनी शिवसेनेला चोख प्रत्युत्तर देण्याचे संकेत दिले आहेत. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nilesh Raneनिलेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेkankavli-acकणकवलीShiv Senaशिवसेना