शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

Maharashtra Election 2019 : आक्रमक नितेश राणेंना आमच्या शाळेत संयम शिकवू; मुख्यमंत्र्यांकडून भाजपामध्ये 'स्वागत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 15:08 IST

'एकूण मतांपैकी 70 टक्के मते नितेश राणे यांना मिळतील'

कणकवली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवलीमध्येभाजपाचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंच्या आक्रमकतेविषयी भाष्य केले. 

नितेश राणे आपल्या वडिलांप्रमाणे आक्रमक आहेत. विधानसभेच्या सभागृहात असताना त्यांनी कोकणाचा विषय आक्रमतेने मांडला. आक्रमकता हा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे आमच्याकडे आल्यानंतर नितेश राणेंच्या रूपात आक्रमक आणि अभ्यासू नेतृत्व समोर येईल. तसेच, त्यांना आमच्या शाळेत आणल्यानंतर आक्रमकतेबाबत संयम बाळगण्याचे धडे शिकवू, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. याशिवाय, कणकवली विधानसभा मतदारसंघातील एकूण मतांपैकी 70 टक्के मते नितेश राणे यांना मिळतील. इतर सगळ्या उमेदवारांना मिळून 30 टक्के मते मिळतील. हे माझे भाकीत आहे. तुम्ही डायरीत लिहून घ्या, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. 

याचबरोबर, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे भाजपामध्ये विलीनीकरण झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नारायण राणेंच्या नेतृत्वाचे कौतुक केले. तसेच, नारायण राणेंशी सुरुवातीपासूनच माझे चांगले संबंध होते. नारायण राणेंनी विरोधी पक्षनेता म्हणून आक्रमक काम केले होते. विरोधी पक्षात असताना त्याचे मार्गदर्शन सुरुवातीपासूनच लाभले. आज राणेंचा संपूर्ण परिवार भाजपावासी झाला आहे, त्याचा खूप आनंद झाला आहे. नारायण राणेंचे नेतृत्व आणि कर्तृत्व यांचा फायदा पक्षाविस्तारासाठी होईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील ठळक मुद्दे :-- नारायण राणेंसोबत भरपूर काम केले आहे.- आक्रमक विरोध पक्षनेता म्हणून मी त्यांना पाहिले आहे.- स्वाभिमान परिवार आमचा झाला. राणेंच्या नेतृत्वाचा फायदा होईल.- नितेश आक्रमक, संयमी नेतृत्व म्हणून पुढे येतील.  - महाराष्ट्र कुठेही चुरस नाही.- जिंकणारे लोक आहोत शांततेने वागा.- मागील निवडणुकीत ४२ होते आता २४ येतील.- राहुल गांधी लोकसभेत भाषण करायचे तेच करत आहेत.-जनादेश मोदींसोबत आहे.- पाच वर्षांत ३० हजार किलोमीटर रस्ते तयार केले.-रोजगाराचा मार्ग असणार आहे-सिंधुदुर्ग मोठ्या प्रमाणावर काम केले.-चिपी विमानतळ सुरू होईल.- सी वर्ल्ड प्रकल्प येत्या दोन वर्षात काम सुरू करू.-सिंधुदुर्गात मंत्रिमंडळाची बैठक घेऊ-कोकणातील वाहून जाणारे पाणी अडवून कोकण टँकर मुक्त करू.-एकही व्यक्ती बेघर राहणार नाही यासाठी २०२२ पर्यंत प्रयत्न

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाNarayan Raneनारायण राणे Nitesh Raneनीतेश राणे kankavli-acकणकवली