शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : बापूसाहेबांची भूमी चोर, लफग्यांच्या हातात देऊ नका- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 22:20 IST

सावंतवाडी बापूसाहेबांची भूमी आहे. शिवरामराजेंचे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मोठे योगदान आहे,

सावंतवाडी :  सावंतवाडी बापूसाहेबांची भूमी आहे. शिवरामराजेंचे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मोठे योगदान आहे, त्यामुळे या भूमीत चोर लफग्यांना साथ देऊ नका, दहा घरे फिरणारे तुम्हाला काय देणार नाही, त्यामुळे सावध राहा आणि लाचारांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले सावंतवाडीत शिवसेना उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत केले, ते प्रचारसभेत बोलत होते, यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, विनायक राऊत, शैलेश परब आदी उपस्थित होते. 

पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचा डाव शिवसेनेने मोडून टाकला, राज्यात मजबूत सरकार शिवसेनेमुळे उभे राहिले, यावेळी पाठीमागून वार झाला, तर वाघ नखे काढू, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. नरसिंहरावांनी काँग्रेस चांगली चालवली होती. काँग्रेस कधीही संपणार नाही, देशाच्या स्वातंत्र्यात काँग्रेसचे मोठे योगदान आहे.कोकणचा विकास झाला असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले, तेव्हा राणेंनी टाळ्या वाजवल्या, आम्ही गाडलेली भुते तुम्ही जिवंत केलीत, राणे गद्दार पण कोकण भूमी यांना माफ करणार नाही. यापुढे सरकारच्या विरोधात बोलणार, जे पटले नाही त्यावर बोलणार, राज्याची स्वप्ने पूर्ण करणार, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. मुख्यमंत्र्याशी माझे भांडण नाही वेळीच घाण बाहेर काढा. राडा संस्कृती बंद केली, पाच वर्षांत एक ही दंगल झाली नाही, जिल्ह्यातील सर्व बंडखोर उमेदवार राणे समर्थक आहेत, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.  

गोव्यातील मुख्यमंत्र्यांनी लाचाराच्या प्रचाराला येणे दुर्दैव आहे. दहा घरे फिरणारी माणसे सावंतवाडीला काय न्याय देणार, राजन तेली सहा महिने सावंतवाडीच्या जेलमध्ये होते.त्यामुळे ते सावंतवाडीतून निवडणुकीत उभे राहिले, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी राजन तेलींना हाणला आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019