शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

कणकवलीतून नितेश राणे हॅट्ट्रिक साधणार का ?, उद्धवसेनेचा उमेदवारच ठरेना 

By सुधीर राणे | Updated: October 24, 2024 13:06 IST

नागरिकांमध्ये औत्सुक्य; कणकवली विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा रिंगणात

सुधीर राणेकणकवली : कणकवली विधानसभा मतदारसंघातून आमदार नितेश राणे सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधातील महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप निश्चित नसला तरी तो कोण असेल? नितेश राणे यांना यावेळी आमदारकीची हॅटट्रिक साधता येणार का? याबाबत मतदारसंघात तर्क-वितर्क लढविले जात आहेत.कणकवली विधानसभा मतदारसंघात कणकवली, देवगड आणि वैभववाडी या तीन तालुक्यांचा समावेश होतो. गेल्या अनेक निवडणुकांचा इतिहास पाहता, कणकवली हा भाग नारायण राणे यांचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे २०१४ मध्ये प्रथमच कणकवली मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढणाऱ्या नितेश राणे यांना ७४ हजार ७१५ मते मिळाली होती. तर भाजपकडून लढणारे प्रमोद जठार यांना ४८ हजार ८३६, शिवसेनेचे सुभाष मयेकर यांना १२ हजार ८६३, राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल रावराणे यांना ८ हजार १९६ मते व काँग्रेसचे बंडखोर उमेदवार माजी आमदार विजय सावंत यांना ७ हजार मते मिळाली होती. त्यावेळी नितेश राणे विजयी झाले होते.२०१९ मध्ये राज्यात शिवसेना आणि भाजप यांच्यात युती असताना कणकवली मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आला होता. मात्र, या मतदारसंघात भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्याविरुद्ध शिवसेनेने सतीश सावंत यांना अधिकृत उमेदवारी देऊन रिंगणात उतरवले होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांच्यासाठी मतदारसंघात सभा घेऊन ताकद दिली होती. तर राणेंशी राजकीय शत्रुत्व असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सतीश सावंत यांच्यासाठी कणकवलीत खास प्रचार सभा घेतली होती. त्यावेळी नितेश राणे ८४,५०४ मते मिळवून विजयी झाले होते.शिवसेनेचे सतीश सावंत यांना ५६,३८८, काँग्रेसचे सुशील राणे यांना ३,३५५, मनसेचे राजन दाभोलकर यांना १,४२१, बसपाचे विजय साळकर यांना ४१६, वंचित आघाडीच्या मनाली वंजारे यांना २,०५४, तर बहुजन मुक्ती पार्टीचे वसंत भोसले यांना ३७८ मते मिळाली होती. आता २०२४ मध्ये नितेश राणे पुन्हा या मतदारसंघातून भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवत आपले नशीब अजमावणार आहेत.

यांची नावे चर्चेत!कणकवली मतदारसंघातून आमदार नितेश राणे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून उद्धवसेनेचे संदेश पारकर, अतुल रावराणे, सुशांत नाईक हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, महाविकास आघाडीकडून अजूनही उमेदवार निश्चित झालेला नाही. त्यामुळे त्यांच्या उमेदवाराला मतदारांपर्यंत पोहोचायला कमी दिवस मिळणार आहेत.

कणकवली विधानसभा मतदारसंघ!

  • पुरुष- १,१३,९७५.
  • महिला- १,१६,७६५.
  • एकूण- २,२९,५९२ मतदार. 

उद्धवसेनेचा उमेदवारच ठरेना !२०१९ च्या विधानसभेचा विचार केला, तर भाजपचे आमदार नितेश राणे यांना २८ हजारांचे मताधिक्य होते. २०२४ ची लोकसभा निवडणुक नारायण राणे यांनी लढविली.त्यावेळी या मताधिक्यात १४ हजारांची वाढ झाली. उद्धवसेनेच्यावतीने या मतदारसंघासाठी पक्ष नेतृत्वाने उमेदवार कोण याबाबत संभ्रमावस्था ठेवली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kankavli-acकणकवलीBJPभाजपाNitesh Raneनीतेश राणे