शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

तुमची ओळख आमच्यामुळे, शिवसैनिकांचे राणेंवर जोरदार टीकास्त्र 

By अनंत खं.जाधव | Updated: November 1, 2024 16:10 IST

सावंतवाडी : १९९० साली माजी मुख्यमंत्री नारायण राणे मुंबईमधून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले आणि त्यांनी कणकवली मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यावेळी ...

सावंतवाडी : १९९० साली माजी मुख्यमंत्री नारायण राणे मुंबईमधून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले आणि त्यांनी कणकवली मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांच्या सोबत असलेले तत्कालीन शिवसैनिकांनी एकत्र येत राणेंवर जोरदार टीकास्त्र चढवले. आम्हीच राणेंना सिंधुदुर्ग जिल्हा दाखवला असा दावा ही या नेत्यांनी केला असून, आम्ही आता कुठेही जाणार नाही असा विश्वास गौरीशंकर खोत, परशुराम उपरकर, सतीश सावंत यांनी दिला.उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून शुक्रवारी सावंतवाडीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी आमदार राजन तेली, परशुराम उपरकर, गौरीशंकर खोत, सतिश सावंत, संजय पडते, बबन साळगावकर, उमेश कोरगावकर, मंदार शिरसाट, शब्बीर मणियार उपस्थित होते.उपरकर व खोत म्हणाले, १९९० साली नारायण राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाठवले. त्यानंतर त्यांना कणकवली मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. यावेळी मतदारसंघातील प्रत्येक घर आणि घर आम्ही दाखवले. २२ दिवसात राणेंना निवडून आणले. '..ते जनतेला सांगण्याची वेळ आली' पण आज ते आम्हा सगळ्यांना हे दिले ते दिले असे सांगून टीका करत उणीदूणी काढत आहेत. म्हणूनच खरे काय हे जनतेला कळले पाहिजे म्हणूनच सर्व इतिहास सांगितला. राणे हा इतिहास खोटा ठरवू शकत नाहीत. ते आपण बाळासाहेबांमुळे घडलो सांगतात, पण आम्ही यांना जिल्ह्याची ओळख करून दिली हे कुठेतरी विसरतात ते जनतेला सांगण्याची वेळ आली आहे. जनतेने राणेंचा स्वार्थ ओळखावा केसरकर यांनी राणेंवर टोकाची टीका केली ते चालतात. पण ज्यांनी मदत केली त्यांना हे पाण्यात बघतात. आगामी विधानसभा निवडणुकीत जनतेने राणे याचा स्वार्थ ओळखला पाहिजे असे आवाहन ही उपस्थित नेत्यांनी केले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sindhudurgसिंधुदुर्गsawantwadi-acसावंतवाडीNarayan Raneनारायण राणेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024