शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
3
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
4
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
6
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
7
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
8
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
9
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
10
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
11
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
12
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
13
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
14
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
15
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
16
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
17
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
18
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
19
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
20
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!

वैभववाडीत पाठिंबानाट्य

By admin | Updated: October 27, 2015 23:56 IST

नगरपंचायत निवडणूक : विकास आघाडीच्या दोघांचा काँग्रेसला पाठिंबा; एकाचे घूमजाव

वैभववाडी : वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या दोन नगरसेवकांनी काँग्रेसला दिलेल्या पाठिंब्यावरून मंगळवारी नाट्यमय घडामोडी घडल्या. सकाळी काँग्रेस कार्यालयात विकास आघाडीच्या दोन नगरसेवकांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याचे जाहीर करीत आमदार नीतेश राणे यांनी त्यांचा सत्कार केला. मात्र, सायंकाळी त्यांच्यापैकी एकाने घूमजाव करीत राणेंनी सत्कारासाठी बोलावून पाठिंब्याचे नाटक केल्याचा आरोप नगरसेविका सुचित्रा कदम यांचे वडील रत्नाकर कदम यांनी पत्रकार परिषदेत केला. विकास आघाडीत फूट पाडण्यापेक्षा गावातील चार प्रभागांत पक्षाच्या चिन्हावर आपले उमेदवार निवडून आणून दाखवावेत, असे आव्हान विकास आघाडीने काँग्रेसला दिले आहे. नगरपंचायतीच्या प्रभाग १५ मधून रवींद्र रावराणे व प्रभाग १६ मधून सुचित्रा कदम विकास आघाडीतर्फे बिनविरोध निवडून आले आहेत. यापैकी रवींद्र रावराणे व सुचित्रा कदम यांचे वडील रत्नाकर कदम यांनी नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा दिल्याचे आमदार नीतेश राणे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले आणि दोघांचा सत्कार केला. यावेळी त्यांच्यासमवेत उपस्थित माजी उपसरपंच व वाभवे गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते गंगाराम ऊर्फ दादा रावराणे यांनी या द्वयींचा काँग्रेसला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. विकास आघाडीच्या बिनविरोध नगरसेवकांच्या भूमिकेबाबत ग्रामस्थ अनभिज्ञ होते; तर युतीच्या गोटात सन्नाटा पसरला होता. मात्र, रावराणे व कदम यांच्या पाठिंब्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. परंतु काँग्रेसचा उत्साह दीर्घकाळ टिकला नाही. सायंकाळी चारच्या सुमारास सुचित्रा कदम यांच्या निवासस्थानी विकास आघाडीने पत्रकार परिषद घेतली. आपणास नीतेश राणे यांनी सत्कारासाठी बोलावून घेतले होते. यावेळी तिथे गेल्यावर त्यांनी आमचा पाठिंबा जाहीर केला. मात्र, आम्ही काँग्रेससोबत नसून विकास आघाडीचेच आहोत, असे सुचित्रा कदम यांचे वडील रत्नाकर कदम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)रंगत वाढलीविकास आघाडीच्या बिनविरोध नगरसेवकांच्या पाठिंबा नाट्यामुळे दिवसभर शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. दरम्यान, विकास आघाडीचे दुसरे बिनविरोध नगरसेवक रवींद्र रावराणे यांच्याशी दुपारनंतर संपर्क झाला नसल्याचे विकास आघाडीने स्पष्ट केले. या नाट्यमय घडामोडींमुळे नगरपंचायत निवडणुकीत रंगत वाढणार आहे.