शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; e-KYC साठी मुदतवाढ, जाणून घ्या नवीन तारीख...
2
सुरक्षा दलाचे सर्वांत मोठे यश ! ५०० जवानांचा बळी घेणारा जहाल नक्षल कमांडर 'हिडमा'चा खात्मा ; १० कोटींचे होते इनाम
3
"...याची जाणीव ठेवणं गरजेचं होतं"; ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसने सुनावले, अग्रलेखाला सणसणीत उत्तर
4
चौकशीत आरोपी डॉक्टरांचे मोठे खुलासे; सिग्नल App चा वापर, i-20 ची खरेदी अन्..., अनेक गोष्टी झाल्या उघड
5
VIRAL : आयुष्यातील पहिलीच नोकरी अन् अवघ्या तीन तासांनंतरच दिला राजीनामा! असं नेमकं झालं काय? 
6
Shiv Sena BJP: "थोडी नाराजी तयार झाली असेल, पण आजच्या..."; शिंदेंचे मंत्री नाराज असल्याच्या चर्चेवर बावनकुळे काय म्हणाले?
7
मुंबईकरांची धावपळ! शहरात CNG पुरवठा अचानक ठप्प; ऑटो-टॅक्सीची लांबच लांब रांग, कधीपर्यंत दुरुस्त होणार?
8
"मी तशी नाही…" वादग्रस्त प्रकरणावर व्यक्त होताना बांगलादेशी कर्णधाराने घेतलं हरमनप्रीतचं नाव
9
रेखा झुनझुनवालांनी 'या' बँकेतील हिस्सा वाढवला, शेअर्सनं गाठला नवा उच्चांक; किंमत २४५ रुपयांच्या पार
10
Mumbai Traffic: एलबीएस मार्गावर आता 'गेम चेंजर' पूल; ४० मिनिटांचे अंतर अवघ्या १० मिनिटांत पार होणार!
11
Mumbai Indians मधून बाहेर पडताच Arjun Tendulkar ची धडाकेबाज कामगिरी, साकारलं अनोखं शतक
12
Stray Dogs: लाखभर भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्रे उभारणार कुठे? पालिकेसमोर मोठे आव्हान
13
SIP मध्ये 'ही' चूक कराल तर मोठं नुकसान! फक्त ३ पेमेंट मिस झाल्यास १.५ लाख रुपये बुडतील; पाहा गणित
14
Stock Market Bull Run: तयार राहा! शेअर बाजारात येणार आणखी एक बूल रन; सेन्सेक्स पोहोचणार १,०७,००० पर्यंत?
15
‘साधी एक चिपही बनवता येत नाही, अमेरिकन नागरिक काय कामाचे?’, डोनाल्ड ट्रम्प संतापले, ‘या’ देशाकडून शिकण्याचा दिला सल्ला 
16
अमित शाहांनी दिलेली 30 नोव्हेंबरची डेडलाइन; त्यापूर्वीच सुरक्षा दलांनी हिडमाला संपवले..!
17
आधी बोगस डॉक्टर, नंतर जादूटोण्यावर ठेवला विश्वास; तापाने फणफणलेल्या ३ मुलांनी गमावला जीव
18
Vegetable Rates: भाजीपाल्याने गाठली शंभरी; गवार १६०, मटार १३० रुपये किलो!
19
भारताचा मध्यमवर्ग संकटाच्या उंबरठ्यावर; २ कोटी लोकांच्या नोकऱ्या जाण्याचा धोका
20
त्याच्या चेहऱ्यावर ना पश्चात्ताप ना कसली चिंता; दिल्ली स्फोटातील आरोपीला भेटल्यानंतर वकील म्हणाले.. 
Daily Top 2Weekly Top 5

राणेंचा 'स्वाभिमान' जागला, लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 16:40 IST

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते नारायण राणेंनी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली आहे.

कणकवलीः राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते नारायण राणेंनी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या किती जागा लढणार हे अद्याप जाहीर केलेलं नसलं तरी निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर याचा निर्णय घेऊ, अशी माहिती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खा. नारायण राणे यांनी दिली. कणकवलीतल्या पडवे येथील लाइफटाइम हॉस्पिटलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.लोकसभा निवडणुकीतही पाच राज्यांच्या निकालाप्रमाणेच धक्का बसेल, असं राणे म्हणाले आहेत. तसेच यावेळी त्यांनी भाजपा नेते प्रमोद जठार यांच्यावरही टीका केली. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांना राजकारण कळत नाही. ते राजकारणात अजून लहान आहेत. माझा पक्ष एनडीएचा घटक पक्ष आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे. तसेच पवारांसाहेबांसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री कर्तृत्वशून्य आहेत. पालकमंत्र्यांना निधी कसा खर्च करायचा हेसुद्धा माहीत नाही. म्हणूनच नाना पाटेकरांना आमचा जिल्हा दत्तक घ्यायला सांगतात. हा माणूस उद्या राज्यही विकायला काढले, असं म्हणत राणेंनी केसरकरांवर शरसंधान साधलं आहे.जिल्ह्यात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराला पालकमंत्रीच जबाबदार आहेत, असा आरोपही राणेंनी केला आहे. मात्र, स्वतः उमेदवार असणार की नाही ? याचे उत्तर गुलदस्त्यात ठेवले. तसेच विधानसभा निवडणूक लढणार का? याचेही उत्तर देण्याचे त्यांनी टाळले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा परिषद प्रभारी अध्यक्ष रणजित देसाई, विषय समिती सभापती जेरॉन फर्नांडिस, संतोष साटविलकर, रवींद्र टेंबुलकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे