Lok Sabha Election 2019 : कुडाळ शहरात पोलिसांचे संचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 11:43 IST2019-03-25T11:42:17+5:302019-03-25T11:43:33+5:30
पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या आदेशान्वये सावंतवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने कुडाळ येथे मॉकड्रीलचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ पोलिसांनी शहरातून संचलन केले.
ठळक मुद्देलोकसभा निवडणूक २०१९ : कुडाळ शहरात पोलिसांचे संचलन कुडाळ येथे मॉकड्रीलचे प्रात्यक्षिक
कुडाळ : पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या आदेशान्वये सावंतवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने कुडाळ येथे मॉकड्रीलचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
तसेच कुडाळ शहरातून संचलन करण्यात आले. या संचलनात कुडाळचे पोलीस निरीक्षक जगदीश काकडे, श्वानपथक, वज्रवाहन तसेच पोलीस ठाण्यातील पाच अधिकारी व वीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.