Coronavirus Unlock : लॉकडाऊनला कुठलीही मुदतवाढ असणार नाही : के. मंजुलक्ष्मी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 05:36 PM2020-07-04T17:36:25+5:302020-07-04T17:37:37+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनला कोणत्याही प्रकारची मुदतवाढ नसून हे लॉकडाऊन ८ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंतच आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी शुक्रवारी दिली.

Lockdown will not have any extension: K. Manjulakshmi | Coronavirus Unlock : लॉकडाऊनला कुठलीही मुदतवाढ असणार नाही : के. मंजुलक्ष्मी

Coronavirus Unlock : लॉकडाऊनला कुठलीही मुदतवाढ असणार नाही : के. मंजुलक्ष्मी

Next
ठळक मुद्देलॉकडाऊनला कुठलीही मुदतवाढ असणार नाही जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची माहिती

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात सध्या जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनला कोणत्याही प्रकारची मुदतवाढ नसून हे लॉकडाऊन ८ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंतच आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी शुक्रवारी दिली.

या लॉकडाऊनच्या काळात सर्व प्रकारच्या वैद्यकीय आस्थापना या पूर्ण वेळ सुरू राहणार आहेत. त्यामध्ये औषध दुकानांचाही समावेश आहे. तसेच जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या उद्देशाने जिल्हावासीयांच्या भल्यासाठीच हा लॉकडाऊन केला आहे.

या काळात नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे योग्य ते पालन करून सहकार्य करावे. कोणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.

Web Title: Lockdown will not have any extension: K. Manjulakshmi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.