शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

राजापूर तालुक्यातील कोंडिवळे कासारवाडीमधील भरड परिसरात लावलेल्या फासकीत एक जिवंत बिबट्या अडकल्याची घटना

By admin | Updated: September 17, 2014 23:43 IST

बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

राजापूर : वन्यजिवांना धोका ठरणाऱ्या फासकीबाबत कठोर उपाययोजना सुरू असताना त्याकडे दुर्लक्ष करीत फासकी लावण्याचे प्रकार अद्यापही सुरू आहेत. आज, बुधवारी राजापूर तालुक्यातील कोंडिवळे कासारवाडीमधील भरड परिसरात लावलेल्या फासकीत एक जिवंत बिबट्या अडकल्याची घटना घडली. मात्र, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याची सुटका करून त्यास सुरक्षित अधिवासात सोडले आहे. काही महिन्यांपूर्वी ओणीमध्ये मुंबई-गोवा महामार्गालगतच असणाऱ्या एका विहिरीत ब्लॅक पँथर जातीचा बिबट्या पडला होता. त्यानंतर आता तेथूनच लगत असणाऱ्या कोंडिवळेमधील जंगलात लावलेल्या फासकीत बिबट्या अडकल्याची घटना घडली. सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान कासारवाडीतील एक मुलगी पाणी भरण्यासाठी विहिरीवर चालली असताना फासकीत अडकलेल्या बिबट्याने तिला पाहून जोरदार डरकाळी फोडली. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने हातातील पाण्याची भांडी तेथेच टाकून घरी धूम ठोकली व वाडीतील ग्रामस्थांना ही घटना सांगितली. लगेचच ग्रामस्थ घटनास्थळाकडे हजर झाले. कोंडिवळे गावचे पोलीसपाटील शांताराम करंडे, ओणीचे पोलीसपाटील संजय लिंगायत यांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. त्यानंतर वनपाल सुधाकर गुरव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह फासकीत अडकलेला बिबट्या हा पाच वर्षांचा असून, तो नर जातीचा आहे. त्याची लांबी सहा फूट, तर उंची सव्वादोन फूट आहे. त्याला एकूण १८ नखे असल्याची माहिती वनक्षेत्रपाल अशोक लाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच बिबट्याचा डावा पाय अडकल्याने गंभीर दुखापत झाली नाही टनास्थळाकडे धाव घेतली. फासकीत अडकलेल्या बिबट्याची सुटका करत त्याला पिंजऱ्यात बंद केले. त्यानंतर बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.फासकीत अडकलेल्या या बिबट्याची सुटका करण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कोंडिवळे व ओणी येथील ग्रामस्थांनी मदत केली. यावेळी वनक्षेत्रपाल अशोक लाड, लांजाचे वनपाल लक्ष्मण गुरव, राजापूरचे वनपाल सुधाकर गुरव, संगमेश्वरचे वनपाल तुकाराम यादव, पालीचे वनपाल विलास गुरुवल, वनरक्षक सागर गोसावी, महादेव पाटील, अशोक सांडम, उमेश आखाडे, विक्रम कुंभार, अशोक आरेकर, कृष्णा म्हादये, विजय म्हादये, दामोदर गुरव उपस्थित होते. (प्रतिनिधी)