शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
2
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
3
Sangli Lok Sabha Election 2024 : 'साहेबा'साठी कायपण! सांगलीत निवडणूक निकालासाठी बुलेट अन् युनिकॉर्नची पैज
4
बीडमध्ये बोगस मतदान, काही ठिकाणी फेरमतदान घ्या, बजरंग सोनावणे यांनी केली मागणी   
5
Video - "सुशील कुमार मोदी रागवायचे तेव्हा..."; अश्विनी कुमार चौबे यांना अश्रू अनावर
6
मी कुठलंही वचन दिलं नव्हतं, उद्धव ठाकरे खोटं बोलतायेत; अमित शाहांनी पुन्हा फटकारलं
7
IPO असावा तर असा! ३८६% प्रीमिअमवर झाला लिस्ट, पहिल्याच दिवशी ₹७५ वरुन पोहोचला ₹३६५वर
8
Ganga Saptami 2024: गंगेत स्नान केल्याने खरोखरंच पाप धुतले जाते का? गंगासप्तमिनीत्त वाचा गंगा स्नानाचे महत्त्व!
9
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
10
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
11
Ganga Saptami 2024: गंगा सप्तमीला का केले जाते पितृतर्पण? ते कसे करायचे व त्यामुळे काय फळ मिळते? वाचा!
12
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....
13
एका अटीवर सलमान खानला माफ करु शकतो बिष्णोई समाज, वाचा काय आहे नेमका तोडगा
14
"वारसा चालवण्यासाठी मुल जन्माला घालण्यात अर्थ नाही, जर..," पाहा काय म्हणाले Zerodhaचे Nikhil Kamath
15
इराणचं चाबहार बंदर भारताच्या ताब्यात; अमेरिकेला मिरची झोंबली, चीन-पाकलाही धक्का
16
होर्डिंग पडलेल्या ठिकाणीच नेते भिडले! संजय दिना पाटील किरीट सोमय्यांवर भडकले
17
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
18
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; श्रीराम फायनान्सचे शेअर्स वधारले, सिप्लाच्या शेअरमध्ये घसरण
20
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा

Sindhudurg: कणकवली विधानसभा मतदारसंघातील १६६ मतदान केंद्रांवर होणार थेट प्रक्षेपण

By सुधीर राणे | Published: April 25, 2024 4:15 PM

कणकवली : लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होत आहे. यातील कणकवली विधानसभा मतदार संघातील तब्बल ...

कणकवली : लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होत आहे. यातील कणकवली विधानसभा मतदार संघातील तब्बल १६६ मतदान केंद्राचे थेट प्रक्षेपण होणार आहे. विशेषतः निवडणूक रिंगणातील प्रमुख उमेदवार, तालुक्यातील बडे नेते यांच्या गावातील मतदान केंद्रांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. मतदान केंद्रातील गडबड, बोगस मतदान आदींवर थेट नजर ठेवण्यासाठी ही यंत्रणा राबविण्यात येणार आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने यंदा मतदान प्रक्रीया अधिक पारदर्शक करण्यावर भर दिला आहे. यापुर्वी जी मतदान केंद्रे संवेदनशिल होती. किंवा ज्या मतदानकेंद्रावरील मतदान प्रक्रीया पारदर्शक होणे अपेक्षित आहे. अशा मतदान केंद्राची निवड करण्यात आली आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघातील देवगड, वैभववाडी आणि कणकवली तालुक्यातील एकूण १६६ केंद्रावर थेट प्रक्षेपण होणार आहे. हे प्रक्षेपण निवडणूक आयोगाला, मुख्य निवडणूक आयुक्तांना, लोकसभा निवडणूक अधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी यांना पाहता येणार आहे. यासाठी ज्या मतदानकेंद्राच्या परिसरात मोबाईलची फोरजी रेंज आहे. अशा ठिकाणी यंत्रणा असेल, यासाठी सध्या आयोगाने नेमलेल्या ठेकेदाराचे पथक मतदान केंद्राची पाहणी करीत आहे. निवडणूक विभागाने दिलेल्या यादीनुसार त्या त्या केंद्रावर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. थेट प्रक्षेपणासाठी केंद्राच्या प्रांगणात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVotingमतदानKankavliकणकवली