शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

साहित्यिक स्त्रियांचा इतिहास दडपला

By admin | Published: February 15, 2015 10:38 PM

सतीश काळसेकर यांची खंत : वेंगुर्लेत आनंदयात्रीतर्फे साहित्य संमेलन

वेंगुर्ले : दैनंदिन जीवन आणि सर्जनशील लेखणी यातून साहित्यिक निर्माण होत असतो. अशाप्रकारची साहित्य संंमेलने दरवर्षी व्हावीत. वेंगुर्लेतील या साहित्य संमेलनामुळे येथील युवा पिढीला साहित्यिक होण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. ही कौतुकाची बाब आहे. पूर्वी पुरुषांप्रमाणेच स्त्रियाही साहित्यिक झाल्या. परंतु त्यांचा इतिहास दडपून टाकण्याचा प्रकार घडला, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक व संपादक सतीश काळसेकर यांनी साहित्य संमेलनावेळी व्यक्त केली.सातेरी प्रासादिक संघ संचलित आनंदयात्री वाङमय मंडळाने वेंगुर्ले येथे आयोजित केलेल्या एक दिवसीय साहित्य संमेलनावेळी सतीश काळसेकर अध्यक्षस्थानावरून बोलत होते. साहित्य संमेलनाचे उद्घाटन उद्योजक दादासाहेब परूळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व संमेलनाचे अध्यक्ष सतीश काळसेकर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे वेंगुर्ले अध्यक्ष देवदत्त परूळकर, संयोजन समिती अध्यक्ष वृंदा कांबळी, गटविकास अधिकारी बाबली वायंगणकर, सातेरी प्रासादिक संघाचे अध्यक्ष राजाराम नाईक, मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी विजय गावडे, सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ महाले, खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देऊलकर, नगरसेविका अ‍ॅड. सुषमा प्रभूगावकर, किरात ट्रस्टचे सचिव शशांक मराठे, बांधकाम व्यावसायिक सचिन वालावलकर आदी उपस्थित होते. संमेलनाच्या सुरुवातीला वेंगुर्ले येथील सरस्वती संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. वीरधवल परब यांनी संमेलनाचे अध्यक्ष सतीश काळसेकर यांचा परिचय करून दिला. प्रास्ताविकात दादासाहेब परूळकर यांनी, युवकांनी मागे न राहता आईवडिलांचे आशीर्वाद घेऊन वाटचाल करावी, असे सांगितले. कार्यक्रमाध्यक्ष सतीश काळसेकर म्हणाले, वेंगुर्ले गावाने मला आधार दिला आहे. त्यामुळे वेंगुर्लेबाबत भरपूर आठवणी आहेत. येथील माझ्या नाळ पुरलेल्या जमिनीतील लोकांनी माझा जो आदर-सत्कार केला, त्याने मी भारावून गेलो आहे, असे उद्गार काढले. शिक्षकांना समाजात किती मान आहे, हे आजच्या संमेलनाला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे समजले आहे. संमेलनात कणकवली येथील विघ्नेश पुस्तक भांडार व किरात ट्रस्टने पुस्तक प्रदर्शन मांडले. ज्येष्ठ रांगोळीकार रमेश नरसुले यांनी आरती प्रभूंची काढलेली रांगोळी लक्षवेधी ठरली. (प्रतिनिधी)मान्यवरांचा गौरवसंमेलनाचे औचित्य साधून साहित्य क्षेत्रातील व भाषा संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या व्यक्तींमध्ये संस्कृत भाषा अभ्यासक रा. पा. जोशी, संत साहित्याचे गाढे अभ्यासक देवदत्त परूळकर, लेखक ना. शि. परब, साप्ताहिक किरातचे प्रकाश सुनील मराठे, समीक्षक अनिल सौदागर, कवी पुंडलिक शेट्ये, काव्य संग्रहकार गोविंद पायनाईक, ज्येष्ठ लेखिका उषा परब, कथा संग्रहकार लिलाधर घाडी, ज्येष्ठ संपादिका मीरा जाधव यांचा सतीश काळसेकर यांच्या हस्ते, तर सतीश काळसेकर यांचा दादासाहेब परूळकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.