शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विकासातून मने जिंकण्याचे काम करूया : उदय सामंत, टीकेला उत्तर नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 19:32 IST

Kankavli UdaySamant Sindhudurg- राजकारणात कोणी अंगावर आले तर आपण पळवून लावू शकतो हे वैभव नाईक यांच्या रुपाने बघितले आहे. आता कुणाच्या टीकेला उत्तर न देता विकासातून मने जिंकण्याचे काम आपण करूया, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे केले.

ठळक मुद्दे विकासातून मने जिंकण्याचे काम करूया : उदय सामंत, टीकेला उत्तर नकोकणकवलीत शिवसेनेच्यावतीने सत्कार

कणकवली : राजकारणात कोणी अंगावर आले तर आपण पळवून लावू शकतो हे वैभव नाईक यांच्या रुपाने बघितले आहे. आता कुणाच्या टीकेला उत्तर न देता विकासातून मने जिंकण्याचे काम आपण करूया, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे केले. कणकवली तालुका शिवसेनेच्यावतीने येथील श्रीधर नाईक चौकात उदय सामंत यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला आमदार वैभव नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, संजय आग्रे, राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक अबीद नाईक, सुशांत नाईक, शैलेश भोगले, संदेश सावंत- पटेल, गितेश कडू, रामू विखाळे, कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर, राजू राणे, नीलम सावंत, मंगेश सावंत, हर्षद गावडे, सुमेधा अंधारी, मानसी मुंज, माही परूळेकर, साक्षी आमडोस्कर, राजू राणे, राजू राठोड, सुजित जाधव, राजू शेट्ये, दिगंबर पाटील व इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उदय सामंत म्हणाले, २००४ मध्ये पहिल्यांदा मी आमदार झालो. रत्नागिरी माझी कर्मभूमी असली तरी सिंधुदुर्ग जिल्हा माझी जन्मभूमी आहे. याठिकाणी माझा सत्कार होत आहे याचे समाधान आहे . पुढील वर्षभरात या जिल्ह्यात आपण सांघिकपणे एवढे काम करूया क , विरोधकांची तोंडे कायमची बंद होतील.

असे सांगतानाच आपण केलेल्या सत्काराचा आपल्याला पश्चाताप होणार नाही, याची ग्वाही आपण देतो. येथील श्रीधर नाईक पुतळ्याच्या समोर आपला सत्कार सोहळा होत आहे. त्यांनी विकासाचे जे स्वप्न पाहिले ते आपण सर्वांनी पूर्ण करूया. हीच त्यांना आदरांजली आहे, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Uday Samantउदय सामंतKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्गShiv Senaशिवसेना