शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

सर्वसमावेशक कायद्यासाठी सरकारला भाग पाडू!, पर्ससीनबाबत भूमिका घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 4:16 PM

fisherman Sindhudurg- पारंपरिक मच्छिमार व पर्ससीनधारक यांच्यात गैरसमज करून आपली राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या केंद्र व राज्य सरकारची भूमिका इंग्रजांपेक्षा घातक आहे. शासनाकडून पर्ससीनधारक मच्छिमारांना सावत्र मुलाची वागणूक दिली जात आहे. सरकारने यापुढे हलक्या कानाने निर्णय घेतल्यास आमच्याही बाजूने सर्वसमावेशक कायदा बनविण्यासाठी सरकारला भाग पाडू, असा रोखठोक इशारा सिंधुदुर्ग जिल्हा आधुनिक यांत्रिक रापणकार असोसिएशनच्या वतीने देण्यात आला आहे.

ठळक मुद्देसर्वसमावेशक कायद्यासाठी सरकारला भाग पाडू!पर्ससीनबाबत शासनाची भूमिका घातक असल्याचा आरोप

मालवण : पारंपरिक मच्छिमार व पर्ससीनधारक यांच्यात गैरसमज करून आपली राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या केंद्र व राज्य सरकारची भूमिका इंग्रजांपेक्षा घातक आहे. शासनाकडून पर्ससीनधारक मच्छिमारांना सावत्र मुलाची वागणूक दिली जात आहे. सरकारने यापुढे हलक्या कानाने निर्णय घेतल्यास आमच्याही बाजूने सर्वसमावेशक कायदा बनविण्यासाठी सरकारला भाग पाडू, असा रोखठोक इशारा सिंधुदुर्ग जिल्हा आधुनिक यांत्रिक रापणकार असोसिएशनच्या वतीने देण्यात आला आहे.मालवण-राजकोट येथील हॉटेल हायटाईड येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्ससीनधारकांची बैठक पार पडली. यावेळी अशोक सारंग, रुजारिओ पिंटो, सहदेव बापर्डेकर, जॉन नरोना, गोपीनाथ तांडेल, रेहान शेख यांनी भूमिका मांडताना शासनाच्या धोरणांवर टीकास्त्र सोडले.

आमदार, खासदारांनी व्होटबँकेचा स्वार्थी विचार न करता मासेमारीच्या कायद्याचा सखोल अभ्यास करून आपली मते मांडावीत. डॉ. सोमवंशी समितीने केवळ पर्ससीन मासेमारीचा अभ्यास केला. त्यामुळे मासेमारी करणार्‍या सर्व प्रकारच्या मच्छिमार प्रतिनिधींचा समावेश करून घेत केंद्र व राज्य शासनाने सर्वसमावेशक नवीन कायदा करून धोरणात्मक निर्णय घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली.मासेमारीच्या कायद्यात पर्ससीनची व्याख्या स्पष्ट नाही. शिवाय कायद्यात मासेमारीचे प्रकारही दिलेले नाहीत. त्यामुळे कायद्यातील व्याख्या स्पष्ट करून मग त्याची अंमलबजावणी करावी. क्यार वादळादरम्यान दाभोळ बंदरात आश्रयासाठी थांबलेल्या एलईडी चिनी नौकांवर शासनाने कोणतीही कारवाई केली नाही. उलट त्यांना सर्व सुविधा पुरवण्यात आल्या. मात्र, स्थानिक पर्ससीनधारकांच्या बाबतीत शासन कधीच सकारात्मक नसते. त्यामुळे ही लोकशाही की घराणेशाही? असा सवाल अशोक सारंग यांनी विचारला.मत्स्य विभाग, तहसीलदारांच्या कार्यपद्धतीवर बोटजिल्ह्यात पर्ससीनधारकांवर सातत्याने चुकीच्या पद्धतीने कारवाया केल्या जातात. मत्स्य विभागाकडून ह्यस्पॉटपंचनामाह्ण केला जात नाही. अज्ञानी तांडेलांकडून (खलाशी) कोऱ्या कागदावर सही घेऊन कागद रंगवतात, असा सारंग यांनी आरोप करत थेट तहसीलदारांच्याही कार्यपद्धतीवर बोट दाखविले. तहसीलदारांना कायद्याचा कोणताही अभ्यास नाही. त्यामुळे निर्णय देताना एकाच बाजूने कौल देतात, असाही जाहीर आरोप सारंग यांनी केला.

टॅग्स :fishermanमच्छीमारsindhudurgसिंधुदुर्ग