शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

भरवस्तीत पुन्हा बिबट्या, पिंगुळी येथील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 1:02 PM

leopard, sindhudurgnews, forestdepartment काही दिवसांपूर्वी पिंगुळी, गोवेरी परिसरात दोन लहान बछड्यांसह फिरणाऱ्या मादी बिबट्याने पिंगुळी येथील काही पाळीव जनावरांवर हल्ला करून ती फस्त केली होती. आता पुन्हा एकदा पिंगुळी गावातील मनुष्य वस्तीकडे बिबट्या दिसल्याची माहिती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर यांनी दिली.

ठळक मुद्देभरवस्तीत पुन्हा बिबट्या, पिंगुळी येथील प्रकार बिबट्या पाहिल्याची विकास कुडाळकर यांची माहिती

कुडाळ : काही दिवसांपूर्वी पिंगुळी, गोवेरी परिसरात दोन लहान बछड्यांसह फिरणाऱ्या मादी बिबट्याने पिंगुळी येथील काही पाळीव जनावरांवर हल्ला करून ती फस्त केली होती. आता पुन्हा एकदा पिंगुळी गावातील मनुष्य वस्तीकडे बिबट्या दिसल्याची माहिती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर यांनी दिली.पिंगुळी, गोवेरी तसेच जवळपासच्या परिसरातील मनुष्यवस्तीच्या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून मादी बिबट्या तसेच तिचे दोन बछडे भक्ष्याच्या शोधात फिरताना दिवसाढवळ्या स्थानिकांना दिसले होते. गोवेरी भगतवाडी येथील शेतकरी श्रीधर पालकर यांच्या शेळीवर हल्ला चढवित शेळी बिबट्याने फस्त केली होती.

शेळीवर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पिंगुळी मुस्लिमवाडी येथील शाहीर खुल्ली यांच्या वासरावर हल्ला करून ती फस्त केली. त्यामुळे पाळीव जनावरांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला होता. दरम्यान, आता पुन्हा पिंगुळी गावातील मनुष्यवस्तीकडे बिबट्याचे दर्शन होऊ लागले आहे. या बिबट्याचे मोबाईलवरही शूटींग करण्यात आले आहे. त्यामुळे या बिबट्यांबाबत ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.ग्रामस्थांच्या जीवाला धोका, बंदोबस्ताची मागणी

मनुष्यवस्तीपर्यंत मादी बिबट्या येऊन पाळीव जनावरांवर हल्ले करू लागल्याने ग्रामस्थांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच परिसरात बिबट्यांचा वावर असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाणे धोक्याचे बनले आहे. या मादी बिबट्याचा व तिच्या बछड्यांचा वनखात्याने बंदोबस्त करून शेतकऱ्यांना भयमुक्त करण्याची मागणी होत होती.

सर्व राजकीय पक्षांच्यावतीने उपवनसंरक्षक, सावंतवाडी यांच्याकडे विकास कुडाळकर, वर्षा कुडाळकर, भारत परब, बबल गावडे, राजन सडवेलकर, दीपक गावडे, अजय आकेरकर, शोएब खुल्ली, मुलाफ खुल्ली, बाबू गावडे, प्रसाद प्रभू,सत्यवान अरमलकर, सतीश माडये, सुंदर गावडे, राजन पुरळकर आदींसह ग्रामस्थांनी निवेदन देऊन केली ही मागणी केली होती. 

टॅग्स :leopardबिबट्याsindhudurgसिंधुदुर्गforest departmentवनविभाग