शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या पडला विहिरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 6:48 PM

साटेली-सातार्डा परिसरात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे.

सावंतवाडी : साटेली-देवळसवाडी येथे घरालगत असलेल्या विहिरीत भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या पडला. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, याबाबतची माहिती वनविभागाला समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात सोडले.

साटेली-सातार्डा परिसरात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. बऱ्याचदा बिबट्यांचे दर्शन अनेकांना झाले आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण असतानाच शनिवारी रात्री रामचंद्र बावकर यांच्या घराशेजारी असलेल्या विहिरीत बिबट्या पडला. सकाळी हा बिबट्या ग्रामस्थांच्या नजरेस पडल्यानंतर त्याठिकाणी अनेकांनी धाव घेतली. बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, या घटनेची माहिती ग्रामस्थ प्रशांत साटेलकर यांनी वनविभागाला दिली. वनविभागाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी वनक्षेत्रपाल गजानन पानपट्टे, वनरक्षक विशाल पाटील, ज्ञानेश्वर जाधव, विश्वनाथ माळी, संतोष मोरे, सागर ओझन आदींनी ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत पडलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी विहिरीत दोरीच्या सहाय्याने पिंजरा सोडला. त्यानंतर शर्थीच्या प्रयत्नाने बिबट्याला पिंजऱ्यात बंदिस्त करण्यात वनविभागाला यश आले.

या मदत कार्यात बबन रेडकर, संजय नाईक, प्रशांत साटेलकर, सुरेश नाईक, सुधीर बावकर, पिंट्या कुबल आदी ग्रामस्थांनी सहभाग घेतला.दरम्यान, मानवी वस्तीत बिबट्या शिरू लागल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  पकडलेला बिबट्या मादी जातीचा आहे. तसेच त्याचे वय सुमारे तीन वर्षांचे असावे, असे वनक्षेत्रपाल गजानन पानपट्टे यांनी सांगितले. बिबट्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत उपचार करून उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTigerवाघ