विधानसभेसाठी १५०० पोलीस, ९०० होमगार्ड तैनात करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 03:32 PM2019-10-04T15:32:31+5:302019-10-04T15:35:41+5:30

जिल्ह्यातील २५० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर १० जणांवर हद्दपारीची कारवाई प्रस्तावित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.

For the Legislative Assembly, 1 police, 19 homeguards will be deployed | विधानसभेसाठी १५०० पोलीस, ९०० होमगार्ड तैनात करणार

विधानसभेसाठी १५०० पोलीस, ९०० होमगार्ड तैनात करणार

Next
ठळक मुद्देविधानसभेसाठी १५०० पोलीस, ९०० होमगार्ड तैनात करणार पोलीस प्रशासन सज्ज :  दीक्षित गेडाम

सिंधुदुर्ग : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाबरोबरच पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे. विधानसभेची निवडणूक सुरळीत पार पडावी, कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठी १५०० पोलीस आणि ९०० होमगार्ड अशी व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २५० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर १० जणांवर हद्दपारीची कारवाई प्रस्तावित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.

२१ आॅक्टोबर रोजी विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून आता प्रचाराची रणधुमाळी उठणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून पोलीस प्रशासनानेही या निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी आपली कंबर कसली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकसभेची झालेली निवडणूक विनातक्रार आणि कायदा व सुव्यवस्था यांचे योग्यप्रकारे पालन करून झाली होती. आता विधानसभेची निवडणूकही शांततेत आणि भयमुक्त वातावरणात व्हावी यासाठी जिल्हा पोलिसांनी आवश्यक ती सर्व उपाययोजना केली आहे.

या निवडणुकीसाठी एकूण १५०० पोलीस आणि ९०० होमगार्ड अशी रचना करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक हजार पोलीस कर्मचारी आहेत. तर ५०० होमगार्ड कर्मचारी आहेत. त्यामुळे इतर जिल्ह्यातून अधिकचे लागणारे ५०० पोलीस आणि ४०० होमगार्ड जवान यांची मागणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यात एकूण ९१६ मतदान केंद्रे असून ज्याठिकाणी एक बूथ आहे अशा ठिकाणी एक पोलीस आणि एक होमगार्ड शिपाई ठेवण्यात येणार आहे. तर ज्याठिकाणी २ बूथ आहेत अशा ठिकाणी दोन पोलीस आणि दोन होमगार्ड अशी रचना करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या निवडणुकीत कोणताही गैरप्रकार किंवा कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी एकूण २५ भरारी पथकांची रचना करण्यात आली आहे. या २५ पथकांपैकी तेरा पथके जिल्हाभरात दिवसाची
गस्त घालणार आहेत तर बारा पथके रात्रीच्या वेळी गस्त घालणार आहेत.

जिल्ह्यात जिल्ह्याबाहेरून येणारी दारू तसेच पैसे, हत्यारे आदींवर नजर रहावी याची दक्षता घेण्यात आली आहे. जिल्ह्याच्या सीमेवर पाच तपासणी नाके तयार करण्यात आली आहेत. आतापर्यंत ६२५ शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. तर विनापरवाना वापर होत असलेली दोन शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

निवडणूक कालावधीत दारुचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. मात्र, हा वापर होऊ नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत ५८ जणांवर कारवाई करण्यात आली असून तब्बल ५३ लाख रुपयांचा दारूसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकसभेची निवडणूक कायदा व सुव्यवस्था यांचे रक्षण करून आदर्श आचारसंहितेचे पालन करीत शांततेत पार पडली होती. त्याचप्रमाणे ही विधानसभेची निवडणूक शांततेत आणि भयमुक्त वातावरणात होईल, असा विश्वासही जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

जिल्ह्यातील २५0 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

जिल्ह्यात निवडणूक कालावधीत कोणताही गैरप्रकार होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्ह्यातील २५0 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर १० जणांविरूद्ध हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत, असेही दीक्षित गेडाम यांनी सांगितले.

Web Title: For the Legislative Assembly, 1 police, 19 homeguards will be deployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.