शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

विनायक राऊतांसारख्या कानफुक्या नेत्यांमुळे ठाकरेंची सेना संपली, राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: November 4, 2022 18:23 IST

खासदार विनायक राऊत हे नियुक्तीच्या गोष्टी सांगत असले तरी शिवसेना भाजप युती म्हणून ते निवडून आले आहेत. हे त्यांनी विसरू नये. मात्र, यापुढे ते विजयी होणार नाहीत.

सिंधुदुर्ग : खासदार विनायक राऊत यांना नेहमी कान फुंकण्याची सवय आहे. मी प्रामाणिक काम करीत असताना माझ्या विरोधात त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कान फुंकण्याचे काम केले. विनायक राऊत यांच्यासारख्या कानफुक्या नेत्यांमुळे ठाकरेंच्या शिवसेनेचा ऱ्हास झाला. शिवसेना संपविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. अशी बोचरी टीका राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष, माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली.सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या क्षीरसागर यांनी ओरोस येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी क्षीरसागर म्हणाले, अशी व्यक्ती यापुढे निवडून येऊ नये, यासाठी माझे प्रयत्न असतील. त्यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी मी या ठिकाणी येणार आहे. खा. राऊत हे २०२४ मध्ये खासदार नसतील, असेही क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.क्षीरसागर म्हणाले, गेली ३० वर्षे मी शिवसेनेत प्रामाणिकपणे काम केले, पक्षासाठी योगदान दिले. परंतु कार्यरत असताना शिवसेनेचे सचिव म्हणून कार्यरत असलेल्या राऊत यांनी माझ्या विरोधात पक्षप्रमुखांना भडकविण्याचे काम केले. त्यामुळे ठाकरे यांचा माझ्या विरोधात राग राहिला. त्यामुळेच मी पक्ष सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालो. खासदार विनायक राऊत हे नियुक्तीच्या गोष्टी सांगत असले तरी शिवसेना भाजप युती म्हणून ते निवडून आले आहेत. हे त्यांनी विसरू नये. मात्र, यापुढे ते विजयी होणार नाहीत.त्यांनी स्वतःचे खोके भरलेनिवडणूक कालावधीत पक्षाकडून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि पक्षाचे काम करण्यासाठी निधी दिला जातो. मात्र खासदार विनायक राऊत यांनी हा निधी कधी पदाधिकाऱ्यांपर्यंत दिला नाही. त्यांनी या निधीतून स्वतचे खोके भरले असल्याचा आरोपही शिरसागर यांनी केला.पर्यटन समोर ठेवून विकास व्हावासिंधुदुर्ग या राज्यातील एकमेव पर्यटन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. येथे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे. देवस्थाने व त्या ठिकाणी जाणारे रस्ते विकसित झाले पाहिजे, त्यासाठी निधी खर्च व्हावा अशी आमची भूमिका आहे. आगामी काळात त्याप्रकारे काम केले जाईल, असे राजेश क्षिरसागर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkolhapurकोल्हापूरRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरVinayak Rautविनायक राऊत