आंबा तोडणीचा शेवटचा हंगाम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 17:57 IST2020-05-22T17:55:02+5:302020-05-22T17:57:01+5:30
माणगांवमध्ये आंबा बागायत मोठ्या प्रमाणात नसली तरी काही प्रमाणात घराच्या बाजूलाच चारपाच आंब्यांची कलमे अनेकांनी लावलेली आहेत. यावर्षी आंबा पीक मोठ्या प्रमाणात नसले तरी आता शेवटचा आंबा तोडणीचा हंगाम चालू झालेला आहे.

माणगावमध्ये शेवटच्या आंबा तोडणीस सुरुवात झाली आहे.
ठळक मुद्देआंबा तोडणीचा शेवटचा हंगाम सुरूघराच्या परिसरात आंब्यांची कलमे
माणगांव : माणगांवमध्ये आंबा बागायत मोठ्या प्रमाणात नसली तरी काही प्रमाणात घराच्या बाजूलाच चारपाच आंब्यांची कलमे अनेकांनी लावलेली आहेत. यावर्षी आंबा पीक मोठ्या प्रमाणात नसले तरी आता शेवटचा आंबा तोडणीचा हंगाम चालू झालेला आहे.
घराच्या परिसरात लावलेल्या आंबा कलमाना पाचशे ते हजार आंबे धरले आहेत. हौस म्हणून अनेकांनी आपल्या परिसरात विविध जातींच्या आंब्याची लागवड केलेली आहे. आता शेवटचा आंबा तोडणीचा हंगाम चालू झालेला आहे. दरवर्षी चाकरमानी हा आनंद घेतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांना हा आनंद लुटता आला नाही.