प्रयोगशाळा आता पाणीपुरवठ्याकड

By Admin | Updated: December 29, 2014 00:02 IST2014-12-28T22:30:53+5:302014-12-29T00:02:28+5:30

जिल्हा परिषद : अहवाल उशिरा येऊ लागल्याने आरोग्य विभागाकडील काम काढले..

The laboratory is now full of water | प्रयोगशाळा आता पाणीपुरवठ्याकड

प्रयोगशाळा आता पाणीपुरवठ्याकड

रहिम दलाल - रत्नागिरी -ग्रामीण भागाच्या गावातील पाणी नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळांमध्ये पाठविण्यात येतात़ त्याचे अहवाल आरोग्य विभागाच्या अखत्यारित असलेल्या पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेतून उशिरा येऊ लागल्याने दूषित पाण्यावर उपाययोजना करणे कठीण झाले़ त्यामुळे आता या प्रयोगशाळा आरोग्य विभागाकडून पाणी पुरवठा विभागाच्या नियंत्रणाखाली आणण्यात आल्या आहेत़
शासनाने या घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच दि़ १ जानेवारी, २०१५ पासून करण्यात येणार आहे़ राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत केंद्राकडून मिळणाऱ्या एकूण निधीपैकी ३ टक्के निधी या प्रयोगशाळांवर करण्यात येतो़ दरवर्षी हा निधी पाणी पुरवठा विभागाकडून आरोग्य विभागाकडे वर्ग करण्यात येतो़. शासनाच्या आरोग्य विभागाकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे पाण्यातून विषबाधा, साथीचे आजार पसरण्याच्या घटना वाढल्याने रत्नागिरी जिल्हावगळता राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये आरोग्य विभागावर टीका होऊ लागली़
दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवते़ त्यामुळे टंचाईग्रस्त भागातील विहिरी, बोअरवेल्सच्या पाण्याची पातळी तळ गाठते़ तरीही तेथील पाणी उपसा सुरु असतोच़ तेथील पाणी पिण्यायोग्य आहे की नाही, याची तपासणी करण्याची जबाबदारी पाणी पुरवठा विभागाकडे असते़
आरोग्य विभागाचे कर्मचारी ग्रामीण भागातील गावामध्ये फिरुन प्रत्येक महिन्याला पाणी नमुने गोळा करतात़ ते नमुने पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी देतात़ त्याचा अहवाल जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे आल्यानंतर दूषित पाणी नमूने आढलेल्या त्या-त्या ग्रामपंचायतींना पाणी शुध्दिकरणाच्या सूचना दिल्या जातात़ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाण्याच्या माध्यमातून साथीचे आजार पसरण्याची गेल्या वर्षभरात एकही घटना घडलेली नाही़ मात्र, राज्याच्या इतर काही जिल्ह्यांमध्ये दूषित पाण्यातून साथींचे आजार पसरण्याच्या घटना घडत असतात़ औद्योगिकीकरणामुळे नद्या, तलाव, जलस्त्रोत दूषित होण्याचे घटना वाढत आहेत़ यातील पाणी नमुने तपासणीचे काम वेळेवर करण्यात येत नसल्याने प्रदूषणाबाबत आरडाओरड सुरु असते़
जिल्ह्यात रत्नागिरीत जिल्हास्तरीय आणि ४ उपविभागीय प्रयोगशाळा अशा एकूण ५ पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा आहेत़ या प्रयोगशाळांसह तेथील कर्मचारीवर्ग आणि साधनसामुग्री दि़ १ जानेवारी, २०१५ पासून एकाच छत्राखाली आणून पाणी पुरवठा विभागाकडे वर्ग करण्यात येणार आहेत़
पाणीपुरवठा विभागाकडे या प्रयोगशाळा वर्ग झाल्याने दूषित पाण्यांचे नमुने सिध्द झाल्यानंतर त्या ठिकाणी उपाययोजना करण्याची प्रक्रिया काही कालावधीतच पूर्ण करणे सोपे होणार आहे.


तपासणी प्रयोगशाळा
जिल्ह्यामध्ये आजघडीला खालीलप्रमाणे पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा आहेत़
रत्नागिरी- जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा, रत्नागिरी़,
मंडणगड- उपविभागीय प्रयोगशाळा, ग्रामीण रुग्णालय, भिंगळोली.
दापोली- उपविभागीय प्रयोगशाळा
ग्रामीण रुग्णालय, दापोली़,
चिपळूण- उपविभागीय प्रयोगशाळा
ग्रामीण रुग्णालय, कामथे़,
लांजा- उपविभागीय प्रयोगशाळा, ग्रामीण रुग्णालय, लांजा़


३ टक्के निधी प्रयोगशाळांवर खर्ची
राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत केंद्राकडून मिळणाऱ्या एकूण निधीपैकी ३ टक्के निधी या प्रयोगशाळांवर खर्च करण्यात येतो़ दरवर्षी हा निधी पाणी पुरवठा विभागाकडून आरोग्य विभागाकडे वर्ग करण्यात येतो़

Web Title: The laboratory is now full of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.