कुडाळमध्ये शालेय विद्यार्थ्याची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 15:08 IST2017-09-07T15:06:06+5:302017-09-07T15:08:44+5:30
शुभम दिंगबर नार्वेकर वय वर्षे 16 या मुलाने आपल्या राहत्या घरी बुधवारी रात्री गळयाला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली.

कुडाळमध्ये शालेय विद्यार्थ्याची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
सिंधुदुर्ग, दि. 7 - कुडाळ तालुक्यातील माणगाव-मळावाडी येथील दहावीत शिक्षण घेत असलेल्या शुभम दिंगबर नार्वेकर वय वर्षे 16 या मुलाने आपल्या राहत्या घरी बुधवारी रात्री गळयाला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली.
नार्वेकर कुटुंबावर शुभमच्या मृत्यूने शोककळा पसरली आहे. आज सकाळी शुभमवर अंत्यसंस्कार करण्यात आले. माणगाव मधील हायस्कूल व मराठी शाळा आज शुभमच्या मृत्यूच्या घटनेमुळे लवकर सोडण्यात आल्या.
माणगाव मळावाडी येथील शुभम दिंगबर नार्वेकर हा मुलगा आंबोली सैनिक स्कूलमध्ये शिक्षण घेत होता तर याच वर्षी त्याच्या वडीलांनी शुभमला माणगाव हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी घातले होते. आत्महत्येमागचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.