सिंधुदुर्ग जिल्ह्यात के.पी.पाटील यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 13:15 IST2017-10-30T13:06:51+5:302017-10-30T13:15:56+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री मौनीनगर येथील श्री दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी निवड झालेल्या के. पी. पाटील यांची कोल्हापुर येथे भेट घेवून माजी आमदार विजय सावंत यांनी त्यांचा सत्कार केला.

कोल्हापुर येथे माजी आमदार के.पी.पाटील यांचा सत्कार विजय सावंत यांनी केला. यावेळी मधुकर सावंत, प्रा. विलास ऐनापुरे उपस्थित होते.
कणकवली ,दि. ३० : कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री मौनीनगर येथील श्री दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी निवड झालेल्या के. पी. पाटील यांची कोल्हापुर येथे भेट घेवून माजी आमदार विजय सावंत यांनी के. पी. पाटील यांचा सत्कार केला.
श्री दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माजी आमदार कृष्णा परशुराम पाटील उर्फ़ के.पी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली 21 संचालकानी विजय संपादन केला आहे.
याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील शिडवणे येथील विजय सावंत शुगर अॅण्ड अग्रो प्रॉडक्ट लिमिटेड या नियोजित साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार विजय सावंत यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी कारखान्याचे संचालक मधुकर सावंत , प्रा. विलास ऐनापुरे आदी उपस्थित होते.
माजी आमदार के.पी.पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिडवणे येथे होऊ घातलेल्या साखर कारखान्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी विजय सावंत यांना दिले.