शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरची एकांकिका प्रथम!, कणकवलीत बॅ. नाथ पै एकांकिका स्पर्धेच्या खुल्या गटाचा निकाल जाहीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 17:05 IST

कलरफूल माँक, मुंबईची ‘टिनीटस’ द्वितीय तर' ढ 'मंडळी, कुडाळची ‘वाल्मिकी’ही एकांकिका तृतीय क्रमांक

कणकवली : येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित बॅ.नाथ पै एकांकिका स्पर्धेच्या खुल्या गटात परिवर्तन कला फाऊंडेशन कोल्हापूरच्या ‘जंगल जंगल बटा चला है’ला प्रथम क्रमांक मिळाला आहे. कलरफूल माँक, मुंबईची ‘टिनीटस’ द्वितीय तर' ढ 'मंडळी, कुडाळची ‘वाल्मिकी’ही एकांकिका तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे. स्पर्धेतील उत्कृष्ट दिग्दर्शनमध्ये ‘टिनीटस’चे नचिकेत यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. ‘जंगल जंगल बटा चला है’चे किरणसिंह चव्हाण यांनी द्वितीय तर रंगयात्रा नाट्य संस्था, इचलकंरजीच्या ‘हा वास कुठून येतोय?’चे अनिरुद्ध दांडेकर यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. तांत्रिक अंगांमध्ये ‘टिनीटस’ने प्रथम क्रमांक पटकाविला. ‘जंगल जंगल बटा चला है’ने द्वितीय तर झिरो बजेट प्रोडक्शन,सिंधुदुर्गच्या ‘दिल ए नादान’ ने तृतीय क्रमांक पटकाविला. अभिनय पुरुषमध्ये ‘टिनीटस’मध्ये डॅनीची भूमिका साकारलेला आदित्य खेडेकर याने प्रथम क्रमांक पटकाविला. ‘हा वास कुठून येतोय?’मध्ये जगन्याची भूमिका साकारलेला प्रतीक हुंदरे याने द्वितीय तर वक्रतुंड थिएटर, नेरूरच्या ‘मधूमाया’मध्ये मधूची भूमिका साकारलेला योगेश जळवी याने तृतीय क्रमांक पटकाविला. अभिनय स्त्रीमध्ये कलासक्त, मुंबईच्या ‘विभावांतर’मध्ये अन्वयाची भूमिका साकारलेली डॉ. यशश्री कंटक हिने प्रथम क्रमांक पटकाविला. समांतर सांगलीच्या ‘मर्सिया’मध्ये अहिल्याची भूमिका साकारलेली धनश्री गाडगीळ हिने द्वितीय तर नाट्यसमर्थ गोरेगावच्या ‘पानंद’मध्ये अनुष्काची भूमिका साकारलेली ज्ञानदा खोत हिने तृतीय क्रमांक पटकाविला. उत्तेजनार्थ पारितोषिक राडा क्रिएशन, मुंबईच्या ‘झो झेंगाट झाल ना’मध्ये नानाची भूमिका साकारलेल्या दीपक लांजेकर व स्मृती थिएटर्सच्या ‘जांभूळ पडल्या झाडाखाली’मध्ये माळीणची भूमिका साकारलेल्या किमया कदम हिने पटकाविले. या स्पर्धेचे परीक्षण डॉ. प्रवीण भोळे व अरुण घाडीगांवकर यांनी केले. स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिके देण्यात आली. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे शरद सावंत यांनी सूत्रसंचालन केले. यशस्वी संघाचे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष ऍड.नारायण देसाई यांनी अभिनंदन केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग