कोकण किनारपट्टी खवळली, मासेमारी व पर्यटनाला फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2018 06:41 PM2018-04-21T18:41:49+5:302018-04-21T18:41:49+5:30

कोकण किनारपट्टीवर वाऱ्यांचा जोर अचानक वाढल्याने भारतीय हवामान खात्याने मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Kokan coastal storm, fishing and tourism hit | कोकण किनारपट्टी खवळली, मासेमारी व पर्यटनाला फटका

कोकण किनारपट्टी खवळली, मासेमारी व पर्यटनाला फटका

googlenewsNext

मालवण-  (जि. सिंधुदुर्ग): कोकण किनारपट्टीवर वाऱ्यांचा जोर अचानक वाढल्याने भारतीय हवामान खात्याने मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. शनिवारी (२१) व रविवारी (२२) या दोन दिवसात किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात लाटा उसळणार आहेत. खोल समुद्रात वाऱ्याचा प्रभाव कमी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 
दरम्यान, मच्छिमार, सागरी पर्यटन व्यावसायिक व किनारपट्टीवरील बांधवाना मत्स्यविभाग व बंदर विभागाचा सतर्कतेचा इशारा देताना समुद्रात जाऊ नये, अशा नोटीसा बजावल्या आहेत. भरतीच्या वेळी सावध राहावे. नौका एकमेकांपासून योग्य अंतर ठेवून नांगरून सुरक्षित स्थळी (बंदरात) ठेवाव्यात. स्कुबा डायव्हिंग, पॅरासेलिंग व अन्य जलक्रीडा प्रकार तसेच किल्ला प्रवासी होडी सेवा बंद ठेवावी. नौकांनी वादळी वेळेत बंदरातील येणे-जाणे टाळावे. तसेच मच्छीमारांनी आपल्या मासेमारी नौका सुरक्षित स्थळी ठेवाव्यात, असं म्हटलं आहे. 

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर वादळी वाऱ्याचा वेग वाढल्याने मासेमारी व्यवसायासह पर्यटनाला मोठा फटका बसला. उन्हाळी हंगामातील शनिवार व रविवारी या दोन दिवशी वाऱ्यांचा जोर कायम असल्याने पर्यटन व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. भारतीय हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर सिंधुदुर्ग किनारपट्टीवर सतर्कतेच्या सुचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

Web Title: Kokan coastal storm, fishing and tourism hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.