शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

किर्तनातून दुसऱ्याला ज्ञान मिळेल

By admin | Updated: December 29, 2014 00:07 IST

दादा साई : वझरे येथील किर्तन मेळाव्यात मार्गदर्शन

कसई दोडामार्ग : नारदाच्या गादीवर उभा राहून कीर्तन करणे ही कला आहे. किर्तनामधून ज्ञानाचे भांडार खुले होेते. किर्तनकार स्वत: घडवितो आणि दुसऱ्याला ज्ञान देऊन उत्कृष्ट कीर्तनकार घडवितो, हीच खरी समाजसेवा आहे. ही कला जोपासणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन साई मठाचे अध्यक्ष व संत दादा साई यांनी वझरे येथे कीर्तन मेळाव्याप्रसंगी केले. वझरे येथे भव्य बाल कीर्तन महोत्सव नुकताच झाला. कै. लक्ष्मण वझे व कै. प्रभाकर वझे यांच्या स्मरणार्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी दादा साई बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर, संत कीर्तनकार सागर जावडेकर, सरपंच सागर नाईक, सुहास वझे, मंगेश माणिक, यशवंत आठलेकर, रंगनाथ गवस, बाळू गवस, बाबुराव शिरोडकर, एकनाथ गवस, केशव वझे, सत्यवान गवस, काशिनाथ वझे, केशव वझे, वैभव वझे, गुरुदास दामले, शिवाजी वझे, प्राची दामले, गौरी दामले, मनोज वझे आदी उपस्थित होते.यावेळी दादा साई पुढे म्हणाले की, एक काळ किर्तनाला महत्त्व होते. किर्तन ऐकण्यासाठी भक्तांची गर्दी व्हायची. मात्र, आता किर्तनासाठी गर्दी होत नाही. कलियुग असल्याने लोकांची पसंती आॅर्केस्ट्रा, सिनेमा, नाचगाणी आदी गोष्टींंना मिळत आहे. किर्तन कला जिवंत ठेवण्यासाठी असे किर्तन महोत्सव आयोजित करणे हा एकमेव उपाय आहे. ज्ञानाचे भांडार असते. ते परिपूर्ण असते. आपल्याकडे हे ज्ञानाचे भांडार दुसऱ्यांना देण्यासाठी धडपड सुरू असते. ही कला जिवंत ठेवण्यासाठी सुहास वझे प्रयत्न करीत आहेत. त्याचबरोबर सर्वांनी एकत्र येऊन किर्तन कला अखंड ठेवण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन दादा साई यांनी केले. सागर जावडेकर म्हणाले, किर्तनकाराच्या अंगी ज्ञानाचे अफाट सामर्थ्य असते. ते सर्व समावेशक असते. किर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम करत असतो. किर्तन रसिकांना मंत्रमुग्ध करते. किर्तनकार आपल्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्याचे ज्ञान द्विगुणीत करण्यासाठी करतो. त्यामुळे ही समाजसेवाच आहे, असे सांगितले. (वार्ताहर)