शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या आगमनाने महामार्गावर चिखलाचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 18:03 IST

गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने नांदगांव परिसरातील शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाला आहे. मात्र, या पावसामुळे महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपावसाच्या आगमनाने महामार्गावर चिखलाचे साम्राज्यवीज आणि दूरध्वनी सेवा सातत्याने विस्कळीत

तळेरे : गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने नांदगांव परिसरातील शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाला आहे. मात्र, या पावसामुळे महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.रविवारी सायंकाळपासून पावसाच्या सरी कोसळू लागल्या. अचानक आलेल्या पावसाने वातावरणात थंडावा निर्माण झाला. तरीदेखील पावसापूर्वी करायची कामे शिल्लक असल्याने अनेकांची धावपळ झाली.नांदगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या मार्गावर महामार्गाच्या मातीमुळे सर्वत्र चिखल पसरला आहे. सध्या एकीकडे कोरोनाचे संकट आणि दुसरीकडे आता पावसाला सुरुवात झाल्याने या आरोग्य केंद्रात जाणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. या लोकांना अशा चिखलातून जावे लागणार आहे. याशिवाय दुचाकी अशा चिखलातून घसरून पडण्याची शक्यता आहे. यातून मोठा अपघात घडू शकतो.नांदगाव तिठ्यावरील काही दुकानांसमोर पहिल्याच पावसाने अक्षरश: चिखल साचला आहे. नियमित रस्त्यालगत असणारे गटार उपसून माती रस्त्यावर टाकण्यात आली. त्यामुळे सर्वत्र चिखल झाला आहे. याबाबत यापूर्वीच या व्यावसायिकांनी संबंधित प्रशासनाला याची पूर्वकल्पना देऊनही आता त्याकडे दुर्लक्ष केला जात आहे. यामुळे निर्माण होणाऱ्या समस्येला जबाबदार कोण? असा सवाल करीत स्थानिक व्यवस्थापनाने याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.यातच वीज आणि दूरध्वनी सेवा सातत्याने विस्कळीत होत आहे. हवामान खात्याचा अंदाज चुकवून अगोदरच हजेरी लावलेल्या या पावसामुळे अनेक कामे अर्धवटच राहण्याची शक्यता आहे. मध्यंतरी लॉकडाऊनमुळे काही कामे बंद होती. ती आता सुरू झाली. तोपर्यंत पावसाचे आगमन झाले आणि पुन्हा सुरू केलेली कामे थांबवावी लागणार असल्याचे दिसून येते. 

टॅग्स :highwayमहामार्गRainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग