शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

खारेपाटण वीज उपकेंद्रात लागलेली आग दीड तासांनंतर आटोक्यात, वारंवार घटनांमुळे भीतीचे वातावरण

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: October 9, 2023 12:42 IST

कणकवली, देवगड, राजापूर आदी भागातील गावांचा वीजपुरवठा तत्काळ बंद करण्यात आला होता

खारेपाटण (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश गावांना वीजपुरवठा करणाऱ्या महत्वाच्या अशा खारेपाटण येथील महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषण कंपनीच्या २२०/१३२ के.व्ही. वीजपुरवठा केंद्रात रविवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान अचानक एका इन्स्टूमेंट (यांत्रिक अंमलबजावणी यंत्र)ला आग लागत धुराचे लोंड जमा झाल्याने एकच धावपळ उडाली. स्थानिक कर्मचाऱ्यांच्या मदतीने आग तातडीने आटोक्यात आणली गेली. तर सुरक्षेच्या कारणास्तव खारेपाटण सह कणकवली, देवगड राजापूर आदी भागातील गावांचा वीजपुरवठा तत्काळ बंद करण्यात आला होता. दीड तासाच्या कालावधीनंतर वीज कर्मचाऱ्यांच्या मदतीने वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. त्या काळात या भागातील नागरिक अंधारात होते.घटनेची माहिती मिळताच खारेपाटण येथील सहायक कनिष्ठ अभियंता किशोर मर्ढेकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. रविवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामना सुरू होता. तसेच खारेपाटण येथील सार्वजनिक गणपती उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या खुल्या ढोल वादन स्पर्धेत देखील अचानक वीज गेल्याने व्यत्यय निर्माण झाला. मात्र पुन्हा वीज कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करून विद्युतपुरवठा पुन्हा सुरू केल्याने स्पर्धा कार्यक्रम यशस्वी पार पडला.

कार्यकारी अभियंत्यांची तत्परताखारेपाटण येथील महापारेषण उपकेंद्र मधील ट्रान्सफॉर्मर फुटून पेट घेतल्यानंतर कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी तातडीने माहिती घेत राधानगरी फिडर लाईन वरून कणकवली शहरातील खंडित झालेला वीज पुरवत तत्काळ सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. तर इतर भागातील वीजपुरवठा तात्पुरता रत्नागिरी जिल्हा फिडर लाईन वरून घेऊन सुरू करण्यात आला.

वारंवार घटनांमुळे भीतीचे वातावरणखारेपाटण येथील वीज सबस्टेशन केंद्रात यापूर्वी देखील मोठी आग लागून यामध्ये ट्रान्सफॉर्मर जळून राख झाला होता. यावेळची लागलेली आग जरी कमी असली तरी यामुळे भविष्यात एखाद्या मोठ्या अपघाताला किंवा घटनेला विद्युत मंडळाला सामोरे जावे लागेल. तरी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या अधिकारी वर्गाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असून उपकेंद्रामध्ये अधून मधून ट्रान्सफॉर्मरला आग लागून पेट घेण्याच्या घटनेत वाढ होत आहे. यावर वेळीच उपाय काढणे गरजेचे आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfireआग