खारेपाटण- रामेश्वरनगर येथील बालिकेचा सर्पदंशाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 15:53 IST2017-10-03T15:53:48+5:302017-10-03T15:53:53+5:30

कणकवली तालुक्यातील खारेपाटण- रामेश्वरनगर येथील रहिवासी तथा व्यापारी  मिलिंद डोळ यांची सहा महिन्याची कन्या श्रुती हिचा राहत्या घरी सर्पदंशाने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास उघड झाली.

Kharepatan- The death of a snakebite by a child in Rameswaranagar | खारेपाटण- रामेश्वरनगर येथील बालिकेचा सर्पदंशाने मृत्यू

खारेपाटण- रामेश्वरनगर येथील बालिकेचा सर्पदंशाने मृत्यू

खारेपाटण, दि. ३  : कणकवली तालुक्यातील खारेपाटण- रामेश्वरनगर येथील रहिवासी तथा व्यापारी  मिलिंद डोळ यांची सहा महिन्याची कन्या श्रुती हिचा राहत्या घरी सर्पदंशाने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास उघड झाली.


मिलिंद डोळ यांचे कुटुंबिय श्रुती हिच्यासह रविवारी रात्री जेवण झाल्यानंतर झोपी गेले होते. सोमवारी सकाळी त्यांची पत्नी जागी झाली. त्यानंतर तीने श्रुती हिला जागे करण्याचा प्रयत्न केला. मात्र ती उठली नाही. त्यामुळे मिलिंद डोळ यांनी खारेपाटण आरोग्य केंद्रातील डॉक्टरना घरी बोलाविले.

डॉक्टरनी श्रुती हिला तपासल्यानंतर ती मृत झाल्याचे घोषित केले. अधिक तपासणी केल्यानंतर श्रुती हिला सर्पदंश झाल्याने तिचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरानी सांगितले. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास श्रुती हिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


घरात सर्पदंश होवून मृत्यु होण्याची खारेपाटण येथील ही दूसरी घटना आहे. साधारणत: चार वषार्पुवीर्ही पहिलीत शिकणा?्या विद्यार्थिनीचा मृत्यु घरातच सर्पदंश झाल्याने झाला होता.

Web Title: Kharepatan- The death of a snakebite by a child in Rameswaranagar