शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पक्षाच्या नेत्यांवर होणारे शाब्दिक हल्ले परतवून लावणार, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशानंतर केसरकर अॅक्शन मोडवर

By अनंत खं.जाधव | Updated: March 27, 2025 17:20 IST

सावंतवाडी : गेल्या काही दिवसापासून मी शांत होतो. पण आता गुढीपाडव्यापासून पुन्हा एकदा सक्रीय होणार असून पक्षाचे मुख्य प्रवक्ता ...

सावंतवाडी : गेल्या काही दिवसापासून मी शांत होतो. पण आता गुढीपाडव्यापासून पुन्हा एकदा सक्रीय होणार असून पक्षाचे मुख्य प्रवक्ता म्हणून जोमाने काम करणार आहे. पक्षाच्या नेत्यांवरील होणारे शाब्दिक हल्ले परतवून लावणार तसे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्याचे योग्य पालन करणार पक्षाची बाजू भक्कम पणे जनतेसमोर ठेवणार असल्याची माहिती माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी दिली. मी नाराज नाही. आणि पदासाठी ही कुठले काम करत नाही असे स्पष्टोक्ती ही त्यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागतासाठी केसरकर हे आंबोली नांगरतास येथे आले होते. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब, प्रेमानंद देसाई, विशाल बांदेकर, सुनिल नार्वेकर उपस्थित होते.महाराष्ट्रात झालेल्या सत्तातर नाट्यानंतर केसरकर यांनी शिंदे सेनेचे प्रवक्ते म्हणून ठळकपणे बाजू मांडली होती. त्यानंतर नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर केसरकर गेले काही दिवस शांत होते. मात्र सद्यस्थिती लक्षात घेता राज्यात पक्षासह नेत्याची बाजू मांडण्यासाठी पुन्हा एकदा दीपक केसरकर यांना प्रवक्ते म्हणून काम करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या आहेत. याबाबतची माहिती केसरकर यांनी दिली. गुढीपाडव्यानंतर सर्व घटना विस्तृतपणे मांडेन असेही केसरकर म्हणाले.नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी आग्रहीदिशा सालियान प्रकरणावर केसरकर यांनी कोणतेही भाष्य केले नाही. हे प्रकरण न्यायालयात आहे त्यामुळे मी त्यावर बोलू शकत नाही असे त्यांनी सांगितले. पण अवकाळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना मदत मिळावी म्हणून आग्रही असल्याचे केसरकर यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliticsराजकारणDeepak Kesarkarदीपक केसरकर