पक्षाच्या नेत्यांवर होणारे शाब्दिक हल्ले परतवून लावणार, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशानंतर केसरकर अॅक्शन मोडवर
By अनंत खं.जाधव | Updated: March 27, 2025 17:20 IST2025-03-27T17:19:11+5:302025-03-27T17:20:46+5:30
सावंतवाडी : गेल्या काही दिवसापासून मी शांत होतो. पण आता गुढीपाडव्यापासून पुन्हा एकदा सक्रीय होणार असून पक्षाचे मुख्य प्रवक्ता ...

पक्षाच्या नेत्यांवर होणारे शाब्दिक हल्ले परतवून लावणार, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशानंतर केसरकर अॅक्शन मोडवर
सावंतवाडी : गेल्या काही दिवसापासून मी शांत होतो. पण आता गुढीपाडव्यापासून पुन्हा एकदा सक्रीय होणार असून पक्षाचे मुख्य प्रवक्ता म्हणून जोमाने काम करणार आहे. पक्षाच्या नेत्यांवरील होणारे शाब्दिक हल्ले परतवून लावणार तसे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्याचे योग्य पालन करणार पक्षाची बाजू भक्कम पणे जनतेसमोर ठेवणार असल्याची माहिती माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी दिली.
मी नाराज नाही. आणि पदासाठी ही कुठले काम करत नाही असे स्पष्टोक्ती ही त्यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागतासाठी केसरकर हे आंबोली नांगरतास येथे आले होते. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब, प्रेमानंद देसाई, विशाल बांदेकर, सुनिल नार्वेकर उपस्थित होते.
महाराष्ट्रात झालेल्या सत्तातर नाट्यानंतर केसरकर यांनी शिंदे सेनेचे प्रवक्ते म्हणून ठळकपणे बाजू मांडली होती. त्यानंतर नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर केसरकर गेले काही दिवस शांत होते. मात्र सद्यस्थिती लक्षात घेता राज्यात पक्षासह नेत्याची बाजू मांडण्यासाठी पुन्हा एकदा दीपक केसरकर यांना प्रवक्ते म्हणून काम करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या आहेत. याबाबतची माहिती केसरकर यांनी दिली. गुढीपाडव्यानंतर सर्व घटना विस्तृतपणे मांडेन असेही केसरकर म्हणाले.
नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी आग्रही
दिशा सालियान प्रकरणावर केसरकर यांनी कोणतेही भाष्य केले नाही. हे प्रकरण न्यायालयात आहे त्यामुळे मी त्यावर बोलू शकत नाही असे त्यांनी सांगितले. पण अवकाळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना मदत मिळावी म्हणून आग्रही असल्याचे केसरकर यांनी यावेळी सांगितले.