शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकची मासेमारी नौका पाठलाग करुन पकडली; आठ खलाशी ताब्यात, गिर्ये समुद्रकिनारी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 15:34 IST

पथकाला पाहताच नौकेने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र गस्ती पथकाने थरारक पाठलाग करून नौकेला जेरबंद केले

देवगड : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून अवैध मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकांविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागाने कडक पावले उचलली आहेत. १० मार्च रोजी रात्री देवगड सागरी हद्दीत गिर्ये समोरील क्षेत्रात कर्नाटक राज्यातील ‘श्री सानिध्या’ ही ट्रॉलिंग नौका बेकायदेशीर मासेमारी करताना रंगेहाथ पकडण्यात आली. पथकाला पाहताच नौकेने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र गस्ती पथकाने थरारक पाठलाग करून नौकेला जेरबंद केले.ही नौका कर्नाटकच्या गणेश बंगेरा यांच्या मालकीची असून, तिला केवळ कर्नाटक राज्याच्या हद्दीत मासेमारीचा परवाना आहे. मात्र, ही नौका महाराष्ट्राच्या हद्दीत १७ ते १८ फॅदम खोलीवर ट्रॉलिंग करत होती. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमानुसार ही कारवाई करण्यात आली असून, जप्त मासळीचा लिलाव देवगड बंदरात करण्यात आला.मध्यरात्री थराररात्री १०:३०च्या सुमारास गस्ती पथक गिर्ये समुद्रात असताना ही नौका आढळली. पथकाने पाठलाग करून नौका ताब्यात घेतली आणि देवगड बंदरात आणली. तांडेलसह आठ खलाशांना ताब्यात घेण्यात आले आहे.कडक कायदेशीर पाऊलपरवाना अधिकारी किरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली. याचा अहवाल सहायक आयुक्त सागर कुवेसकर यांच्याकडे दिला जाणार असून, नौका मालकावर मोठी दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे.स्थानिक मच्छीमारांना दिलासापालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार परप्रांतीय मासेमारीविरुद्ध धडक मोहीम सुरू आहे. या कारवाईमुळे स्थानिक मच्छीमारांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Karnataka Fishing Boat Captured off Girye; Eight Crew Detained

Web Summary : Fisheries Department seized a Karnataka trawler, 'Shree Sanidhya', illegally fishing in Maharashtra waters near Girye. The boat, owned by Ganesh Bangera, was caught after a chase. Eight crew members were detained, and the catch was auctioned. This action, prompted by Nitesh Rane's order, brings relief to local fishermen.