शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

सिंधुदुर्ग : कणकवली मनसेचे घ्ंटानाद आंदोलन, प्रांताधिकाऱ्याना दिले निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 17:03 IST

भाजप शासन सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले आहे. जनतेला अच्छे दिनाचे स्वप्न दाखविणार्‍या या शासनाने सर्वच घटकांतील लोकांसाठी बुरे दिन आणले आहेत.असा आरोप करीत जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचावा यासाठी मनसेच्यावतीने मंगळवारी कणकवली प्रांताधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध घोषणा देत शासनाचा निषेध करण्यात आला.

ठळक मुद्देकणकवली मनसेचे घ्ंटानाद आंदोलनप्रांताधिकाऱ्याना दिले निवेदन

कणकवली: भाजप शासन सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले आहे. जनतेला अच्छे दिनाचे स्वप्न दाखविणार्‍या या शासनाने सर्वच घटकांतील लोकांसाठी बुरे दिन आणले आहेत.असा आरोप करीत जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचावा यासाठी मनसेच्यावतीने मंगळवारी कणकवली प्रांताधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध घोषणा देत शासनाचा निषेध करण्यात आला.घ्ंटानाद आंदोलन केल्यानंतर प्रांताधिकारी निता शिंदे- सावंत यांच्याकडे मुख्यमंत्र्याना देण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, कणकवली तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर, कणकवली शहराध्यक्ष शैलेंद्र नेरकर, महिला जिल्हाध्यक्षा चैताली भेंडे , मनसे विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष अनिल राणे, संतोष कुडाळकर, गुरु भालेकर, शरद सावंत, अरविंद घाडीगावकर , प्रभाकर राणे आदी मनसैनिक उपस्थित होते.यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की , मुख्यमंत्री तसेच भाजप नेत्यांनी निवडणुकीपूर्वी प्रचार सभेमधून व आपल्या जाहिरनाम्यातून जनतेला विकासाची स्वप्ने दाखविली होती. मात्र, गेल्या चार वर्षात महागाईचा डोंगर दिवसेदीवस वाढत चालला आहे. पण रोजगार देणारा एकही उद्योग हे शासन निर्माण करू शकलेले नाही. नोटबंदीनंतर तर हजारो लोक बेरोजगार झाले आहेत. शेतकरीही देशोधडीला लागले आहेत. या धक्क्यातून सर्वसामान्य जनता अजूनही सावरलेली नाही. आता पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमुळे तर सर्वसामान्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.शासन मान्य रास्त दराची दुकाने बंद होण्याच्या स्थितीत आहेत. निराधार पेन्शन योजना, ज्येष्ठ नागरिक आणि कलाकारांचीही पेन्शन थकली आहे. शासकीय आणि खासगी क्षेत्रातील कामगार आणि अधिकारी देखील शासना विरोधात आंदोलन करीत आहेत. शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्याना आंदोलने करावी लागत आहेत. हे निषेधार्ह आहे.अनेक अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचार केला जात आहे. या अधिकाऱ्यांवर कोणाचाच वचक राहिलेला नाही. जिल्ह्याबरोबरच संपूर्ण देशातच खून , दरोडे, बलात्कार अशा घटनांचे प्रमाण वाढले आहे. जनता अगदी मेटाकुटिस आली आहे.सिंधुदर्ग जिल्ह्यात रस्ते खड़ेमय बनले आहेत. धरणांची कामे ठप्प झाली आहेत. शासकीय आरोग्य सेवा जनतेला व्यवस्थित रीत्या न मिळाल्याने काही खासगी डॉक्टरांकडून जनतेची लूट होत आहे. अशा स्थितीत जनतेच्या भावना शासना पर्यन्त पोहचविण्यासाठी तसेच शासनाला जाग आणण्यासाठी हे घ्ंटानाद आंदोलन करण्यात येत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.कड़क पोलिस बंदोबस्त !मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सोमवारी जाहिर केल्याप्रमाणे घन्टानाद आंदोलन मंगळवारी कणकवली प्रांताधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक जंबाजी भोसले, हवालदार तावड़े यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयासमोर कड़क बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आले होते.

 

टॅग्स :MNSमनसेsindhudurgसिंधुदुर्ग