शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
2
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
3
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
4
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
5
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
6
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
7
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
8
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
9
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
10
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
11
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
12
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
13
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
14
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
15
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
16
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
17
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
18
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
19
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
20
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस

सिंधुदुर्ग: ई-पीक नोंदीत कणकवली तालुका सर्वात पुढे!

By सुधीर राणे | Updated: October 28, 2022 13:52 IST

अद्याप अनेक खरिपाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या नोंदी होणे बाकी

कणकवली : शासनाने अॅपच्या माध्यमातून ई-पीक पाहणीची नोंद करण्याच्या सूचना दिल्यानुसार महसूल विभागाने केलेल्या प्रयत्नांनंतर निर्धारित मुदतीत ७८ हजार ९९३ खातेदारांच्या नोंदी झाल्या आहेत. यात कणकवली तालुक्याने सर्वाधिक म्हणजे १२, ५१० नोंदी केल्या आहेत. आता उर्वरित खरिपाच्या पीक पाहणीच्या नोंदी तलाठ्यांमार्फत होणार आहेत. तर रब्बी व इतर बहुवार्षिक पिकांबाबतच्या नोंदी ॲपच्या माध्यमातून करता येणार आहेत.    ई - पीक पाहणीची नोंद ॲपच्या माध्यमातून करण्यासाठी २२ ऑक्टोबरपर्यंत मुदत होती. त्यानुसार कणकवली –१२५१०, कुडाळ -१०८६८, देवगड- १०७३८, दोडामार्ग- ५२५१, मालवण -११४८३, वेंगुर्ले- १० ९९५, वैभववाडी -६७९६ व सावंतवाडी - १०३५२ अशा एकूण ७८,९९३ नोंदी अॅपच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आल्या आहेत.सिंधुदुर्गमध्ये २ लाख ७२ हजार ९५३ खातेदार आहेत. यापैकी ७८ हजार ९९३ खातेदारांच्या नोंदी ॲपच्या माध्यमातून झालेल्या असल्या, तरीही अद्याप अनेक खरिपाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या नोंदी होणे बाकी आहेत. या नोंदी तलाठ्यांच्या माध्यमातून करण्यास परवानगी मिळाली असून तशा पद्धतीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.मात्र, रब्बी व बहुवार्षिक पिकांबाबत अद्यापही अॅपच्या माध्यमातून नोंदी करणे शक्य आहे. मात्र, ॲपच्या माध्यमातून नोंदी करण्यास आलेल्या अडचणी, सातत्याने निर्माण होणाऱ्या समस्या, महसूल विभागाला इतर कामे सोडून याचसाठी करावी लागणारी धडपड याचा विचार करता, याही नोंदी तलाठ्यांच्या माध्यमातूनच पूर्ण कराव्यात, अशी मागणी पुढे येत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFarmerशेतकरी