शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

कणकवली नगरपंचायतीचा ८२ लाख ८७ हजार शिलकीचा अर्थसंकल्प सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 6:56 PM

Budget Kankavli Sindhudurg- कणकवली नगरपंचायतीचा सन २०२१-२२ चा ८२ लाख ८७ हजार ९७६.६६ रुपये शिलकीचा अर्थसंकल्प नगरपंचायत सभेत मंगळवारी सादर करण्यात आला. ४५ कोटी १३ लाख ५१हजार ३७८ रुपये खर्चाचा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्प चर्चेदरम्यान नगरसेवकांनी काही नवीन तरतुदी सुचविल्या आहेत. त्याचा समावेशही केला जाणार आहे.

ठळक मुद्देकणकवली नगरपंचायतीचा ८२ लाख ८७ हजार शिलकीचा अर्थसंकल्प सादरचर्चेदरम्यान नगरसेवकांनी सुचविल्या काही नवीन तरतुदी

कणकवली : कणकवली नगरपंचायतीचा सन २०२१-२२ चा ८२ लाख ८७ हजार ९७६.६६ रुपये शिलकीचा अर्थसंकल्प नगरपंचायत सभेत मंगळवारी सादर करण्यात आला. ४५ कोटी १३ लाख ५१हजार ३७८ रुपये खर्चाचा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्प चर्चेदरम्यान नगरसेवकांनी काही नवीन तरतुदी सुचविल्या आहेत. त्याचा समावेशही केला जाणार आहे.कणकवली नगरपंचायतीचा सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा एकूण अर्थसंकल्प ४५ कोटी ९६ लाख ८ ३९ हजार ३२४ रुपयांचा आहे.गतवर्षी कणकवली नगरपंचायतीचे अंदाजपत्रक सुमारे ६४ कोटींचे होते. मात्र यावर्षी त्यातील सुजल निर्मल अंतर्गतच्या योजनेचे अंदाजित २५ कोटींची तरतूद बजेटमध्ये रद्द करण्यात आल्याने ४५ कोटी ९६ लाख ३९ हजार ३५४ रुपयांचे अंदाजपत्रक अर्थसंकल्पीय सभेत सादर करण्यात आले.कणकवली नगरपंचायतीची अर्थसंकल्पीय सभा नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. यासभेला नगरपंचायतीचे नगरसेवक ऑनलाइन सहभागी झाले होते.या सभेत कणकवली शहर विकासाच्या अनुषंगाने विविध हेडखाली तरतूद करण्यात आली असून, त्यात अग्निशमन, नळ योजना दुरुस्ती, कोंडवाडा, शहरातील विकास कामे, कणकवली नगरपंचायतचा पर्यटन महोत्सव अशा अनेक बाबींसाठी अर्थसंकल्पीय तरतूद करून ठेवण्यात आली आहे.नगरपंचायतीला येत्या आर्थिक वर्षात करांच्या माध्यमातून १ कोटी ८३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. तर आस्थापना आणि प्रशासकीय खर्च, विविध प्रकारचे भत्ते आदींसाठी ८ कोटी ८५ लाखांचा खर्च गृहीत धरण्यात आला आहे. मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी गतवर्षी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. तर यंदा कुत्रे पकड मोहीम राबविण्यात येत असल्याने १५ लाखाची तरतूद करण्यात आली आहे. यंदा देशाची जनगणना होणार आहे. त्याअनुषंगाने नगरपंचायतीने जनगणनेसाठी ५ लाखांची तरतूद केली आहे.

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा जानेवारी महिन्यातील नगरपंचायतीचा महोत्सव रद्द करण्यात आला. मात्र सन २०२२ च्या महोत्सवासाठी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.येत्या आर्थिक वर्षात नगरपंचायतीला १५ व्या वित्त आयोगातून दोन कोटी, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान जिल्हास्तर अंतर्गत ४ कोटी तर राज्यस्तर अंतर्गत ८ कोटी रुपये निधी मिळण्याची शक्यता अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आली आहे.नगरपंचायतीला सन २०२१ -२२ या आर्थिक वर्षात शासनाकडून विशिष्ट प्रयोजनाकरिता अनुदाने, अंशदाने यांच्या माध्यमातून ४५ कोटी ९६ लाख ३९ हजार ३५४.६६ रुपये मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर प्रारंभीची शिल्लक २ कोटी ५० लाख ७३५४.६६ एवढी आहे.

महसुली जमा ८ कोटी ८५ लाख १४ हजार रुपये होतील. तसेच भांडवली जमा ३४ कोटी ६१ लाख १८ हजार रुपये होतील. महसुली खर्च ८ कोटी ८५ लाख ३० हजार ३७८ रुपये होईल अशी शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. तर भांडवली खर्च ३६ कोटी २८ लाख २१हजार रुपये असेल. 

टॅग्स :Budgetअर्थसंकल्पKankavliकणकवलीMuncipal Corporationनगर पालिकाsindhudurgसिंधुदुर्ग