कणकवली : मागील एक आठवड्यापासून ब्रेन हॅमरेजच्या कारणात्सव कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तथा प्रख्यात सर्जन डॉक्टर सहदेव पाटील (५९, लाकूडवाडी , ता . आजरा , सध्या रा . गडहिंग्लज ) यांचे सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास निधन झाले .गडहिंग्लज येथील शिवकृपा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रमुख असलेले डॉ . सहदेव पाटील कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा , दोन मुली , पाच भाऊ व बहीण असा परिवार आहे.डॉ. पाटील हे गडहिंग्लज येथील आपल्या गावी असताना गेल्या आठवड्यात अचानक आजारी पडले होते . त्यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील झाली होती . मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती . निष्णात वैद्यकीय पथक सातत्याने त्यांच्या सेवेत दक्ष होते . मात्र , सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली .डॉ. पाटील हे सुमारे दीड वर्षापूर्वी कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी रुग्णांना चांगली सेवा दिली होती. कोरोनासारख्या काळातही कोरोना सेंटर, स्वॅब सेंटर व उपजिल्हा रुग्णालय अशा तिहेरी जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे हाताळल्या होत्या . मंगळवारी दुपारी त्यांच्यावर मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कणकवलीतील काही डॉक्टर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
कणकवली रुग्णालयाचे अधीक्षक डॉ .सहदेव पाटील यांचे निधन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 18:30 IST
Kankavli Sindhudurg- मागील एक आठवड्यापासून ब्रेन हॅमरेजच्या कारणात्सव कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तथा प्रख्यात सर्जन डॉक्टर सहदेव पाटील (५९, लाकूडवाडी , ता . आजरा , सध्या रा . गडहिंग्लज ) यांचे सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास निधन झाले .
कणकवली रुग्णालयाचे अधीक्षक डॉ .सहदेव पाटील यांचे निधन !
ठळक मुद्देकणकवली रुग्णालयाचे अधीक्षक डॉ .सहदेव पाटील यांचे निधन !ब्रेन हॅमरेजमूळ प्रकृती गंभीर