कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधा, प्रसुती कक्षात केलेल्या सुधारणा आणि माता-बालक यांच्या मृत्यूचे प्रमाण शून्य टक्के झाले आहे. रुग्णालयात नवनवीन बदल स्वीकारून राखलेला दर्जा यामुळे या रुग्णालयाला राज्यात दुसरा क्रमांक तर पुणे विभागात प्रथम क्रमांकाचे रुग्णालय म्हणून भारत सरकारचे नामांकन मिळाले आहे.भारत सरकारने रुग्ण सुविधा पुरविण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी राज्यात लक्ष ही स्पर्धात्मक योजना आयोजित केली होती. या योजनेत शस्त्रक्रिया विभाग, प्रसुती कक्ष, छोट्या बालकांचा व प्रसुतीनंतर ठेवल्या जाणाºया मातांचा कक्ष असे बदल सूचित केले होते. ते कणकवली रुग्णालयाने पूर्ण केले.प्रसुतीदरम्यान माता, बालक यांचे मृत्यूचे प्रमाण कमी होण्यासाठी उपाययोजना करून एकही मृत्यू होऊ दिला नाही. बाह्यरुग्ण विभाग व रुग्णालयात अन्य विभागात दर्जेदार बदल केले. या सर्व कामांची केंद्र आणि राज्य सरकारच्या तपासणी पथकाने पाहणी केली होती. त्यानुसार कणकवली उपजिल्हा रुग्णालयाने राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. यासाठी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. एस. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिकलगार, डॉ. सतीश टाक यांच्यासह सर्वांनीच मेहनत घेतली.रुग्णालयाचे काम उत्कृष्टकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लक्ष योजनेअंतर्गत केलेल्या राष्ट्रीय सर्व्हेमध्ये कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे काम उत्कृष्ट ठरले आहे.
सरकारच्या उत्कृष्ट सेवा देणाऱ्या यादीत कणकवली रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 15:40 IST
कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दिल्या जाणाºया सेवा सुविधा, प्रसुती कक्षात केलेल्या सुधारणा आणि माता-बालक यांच्या मृत्यूचे प्रमाण शून्य टक्के झाले आहे. रुग्णालयात नवनवीन बदल स्वीकारून राखलेला दर्जा यामुळे या रुग्णालयाला राज्यात दुसरा क्रमांक तर पुणे विभागात प्रथम क्रमांकाचे रुग्णालय म्हणून भारत सरकारचे नामांकन मिळाले आहे.
सरकारच्या उत्कृष्ट सेवा देणाऱ्या यादीत कणकवली रुग्णालय
ठळक मुद्देउपजिल्हा रुग्णालयाला केंद्राच्या लक्ष योजनेअंतर्गत नामांकनसरकारच्या उत्कृष्ट सेवा देणाऱ्या यादीत कणकवली रुग्णालय