कणकवली : जमावाची अभियंत्याला मारहाण; बांधकाम अभियंत्यांचे काळ्या फिती लावून कामकाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 13:25 IST2018-12-12T13:22:35+5:302018-12-12T13:25:24+5:30
सिंधुदुर्ग येथील सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता प्रदीप भटकर यांना जमावाने गाडीतून बाहेर खेचून मारहाण केल्याच्या घटनेचा यवतमाळच्या सार्वजनिक बांधकाम अभियंते व कर्मचा-यांनी बुधवारी निषेध नोंदविला.

कणकवली : जमावाची अभियंत्याला मारहाण; बांधकाम अभियंत्यांचे काळ्या फिती लावून कामकाज
यवतमाळ : सिंधुदुर्ग येथील सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता प्रदीप भटकर यांना जमावाने गाडीतून बाहेर खेचून मारहाण केल्याच्या घटनेचा यवतमाळच्या सार्वजनिक बांधकाम अभियंते व कर्मचा-यांनी बुधवारी निषेध नोंदविला.
सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिव (रस्ते) सी.पी. जोशी यांच्या निर्देशावरून राज्यभर सर्व बांधकाम कार्यालयांमध्ये निषेध सभा घेण्यात आल्या. यवतमाळात अधीक्षक अभियंता धनंजय चामलवार, यवतमाळचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपेल्लीकर, विशेष प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता योगेश लाखानी यांच्या नेतृत्त्वात सर्व अभियंते व कर्मचारी एकत्र आले.
त्यांनी कणकवलीतील घटनेचा निषेध नोंदविला. यावेळी निषेध सभा घेण्यात आली. त्यात अधीक्षक अभियंता चामलवार, कार्यकारी अभियंता मरपेल्लीकर यांनी विचार मांडले. अभियंते व कर्मचाºयांनी काळ्या फिती लावून कामकाज केले.