कणकवली मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांची डहाणू येथे बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 13:02 IST2020-05-12T13:01:00+5:302020-05-12T13:02:01+5:30
कणकवलीचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांना पालघर जिल्ह्यातील डहाणू नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी पदस्थापना देण्यात आली आहे.

कणकवली मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांची डहाणू येथे बदली
कणकवली : कणकवलीचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांना पालघर जिल्ह्यातील डहाणू नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी पदस्थापना देण्यात आली आहे.
डहाणू येथील मुख्याधिकारी द्वासे यांची बदली झाल्याने रिक्त झालेल्या पदी कणकवली मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपळे यांना कणकवली मुख्याधिकारी पदावरून कार्यमुक्त करण्यात येत असून त्यांनी तत्काळ डहाणू येथे रुजू होऊन तसा अहवाल शासनास सादर करावा, असा आदेश देणारे पत्र शासनाचे अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांनी काढले आहेत.
कणकवलीतील कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या बैठकांना अनुपस्थित राहणे, नगरपंचायत कार्यालयामध्ये अनुपस्थित राहणे , भ्रमणध्वनी बंद ठेवणे आदी कारणांवरून कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांच्याकडे मुख्याधिकारी पदाचा कार्यभार जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिला आहे .
-- फोटो - अतुल पिंपळे