शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
3
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
4
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
5
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
6
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
7
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
8
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
9
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
10
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
12
कार्तिक आर्यनसोबत हेमांगी कवी शेअर करणार स्क्रीन; 'चंदू चॅम्पियन'मध्ये साकारतेय महत्त्वाची भूमिका
13
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
14
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
15
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
16
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
17
खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक
18
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?
19
विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा
20
आता औषधे संशयाच्या भोवऱ्यात; दर्जाबाबत शंका आल्याने भारतीय कंपन्यांची उत्पादने परत पाठविली

जुन्या बॉयफ्रेंड सोबतची जवळीक कामाक्षीच्या अंगलट, आरोपी प्रकाश संशयी वृत्तीचा

By अनंत खं.जाधव | Published: September 02, 2023 5:09 PM

सावंतवाडी : प्रेयसीने पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून गोवा येथील कामाक्षी उडपनाव हिचा खून केल्याचे सांगितले जात आहे.मात्र आता धक्कादायक ...

सावंतवाडी : प्रेयसीने पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून गोवा येथील कामाक्षी उडपनाव हिचा खून केल्याचे सांगितले जात आहे.मात्र आता धक्कादायक माहिती समोर आली असून कामाक्षी ही आपल्या जुन्या बॉयफ्रेंड सोबत बोलत असल्यानेच संशयित आरोपी प्रकाश चुंचवाड याने कामाक्षी चा खून केल्याचा दावा तिच्या नातेवाईकांकडून करण्यात आला असून प्रकाश हा संशयी होता.तो कामाक्षी कुणाबरोबर बोलली तरी तिला मारहाण करत होता असे ही नातेवाईकांनी सांगितले.गोवा म्हापसा येथील कामाक्षी शंकर उडपनव या युवतीचा तिच्या प्रियकराने पर्वरी येथील तिच्या राहत्या सदनिकेत खून करून तिचा मृतदेह मित्रांच्या मदतीने आंबोली घाटात फेकला होता.शुक्रवारी गोवा पोलिसांनी आंबोली येथे येऊन मृतदेह ताब्यात घेऊन ते गोव्या कडे रवाना झाले त्यानी गोवा बांबुळी येथे मृतदेहांची उत्तरीय तपासणी केली त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.दरम्यान आता या प्रकरणात धक्कादायक खुलासे होऊ लागले असून संशयित आरोपी प्रकाश व कामाक्षी याच्यात मंगळवारी प्रेम प्रकरणांतून कडाक्याचे भांडण झाले होते.हे खरे असले तरी प्रकाश हा थोडा संशयी होता.कामाक्षी कुणाबरोबर बोलली किंवा फिरली तरी तो कामाक्षी ला मारहाण करत असे कामाक्षी हिचा पूर्वी अजूना गोवा येथील जवळचा मित्र होता.मध्यंतरी ती दोघे बोलत नव्हते याच काळात कामक्षी आणि प्रकाश याच्यात मैत्री झाली होती.दोघे म्हापसा येथे फिरताना अनेकांनी बघितले होते.पण प्रकाश याच्या सशयीवृत्ती मुळे कामाक्षी पुन्हा आपल्या जुन्या मित्रांसोबत बोलू लागली हा प्रकाश ला आवडत नव्हते.या कारणावरून त्याच्यात सतत भांडण होत असे प्रकाश तिला मारहाण ही करत असे याच कारणावरून कामाक्षी वैतागली होती.त्यातूनच मंगळवारी कामाक्षी हिने म्हापसा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.या तक्रारीवरून तर प्रकाश हा आणखी संतापला होता.कामाक्षी हिने पोलीसात तक्रार दिल्यानंतर काहि वेळातच या दोघांना पोलिसांकडून समज देऊन सोडून दिले होते.

मंगळवारी मध्यरात्रीच खून  कामाक्षी ही पोलिस ठाण्या वरून रात्रीच्या सुमारास थेट आपल्या पर्वरी येथील सदनिकेत आली तिच्या पाठोपाठ प्रकाश तिच्या घरी आला होता.यावेळी दोघांत जोरदार भांडण झाल्याचे तिच्या नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे.आणि तेव्हाच तिचा खून करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

प्रकाशकडून अनेक वेळा मारहाण कामक्षी ची प्रकाश सोबत एक वर्षापूर्वीच ओळख झाली होती.प्रकाश चे पर्वरी येथे गॅरेज आहे.तसेच कामाक्षी चा पर्वरी येथे सदनिका होती.याकाळात तो येऊन जाऊन असायचा मात्र प्रकाश हा संशयी वृत्तीचा असल्याने प्रकाश कडून तिला सतत मारहाण होत होती.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गgoaगोवाCrime Newsगुन्हेगारीAmboli hill stationआंबोलि हिल स्टेशनPoliceपोलिस