शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील अपघातात कलमठचा युवक ठार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 17:31 IST

Kankavli highway Accident News- मुंबई - गोवा महामार्गावर चौपदरीकरणाच्या परिवर्तित मार्गासाठी लावलेल्या पत्र्याला दुचाकीची धडक बसून कलमठ येथील बाबाजी उर्फ बाळा नांदगावकर (वय २७ ) हा युवक ठार झाला .हा अपघात मंगळवारी रात्री जानवली - बौद्धवाडी येथे महामार्गावर घडला .

ठळक मुद्दे महामार्गावरील जानवली येथे अपघातात कलमठचा युवक ठार !दुचाकी रस्त्याच्या परिवर्तित मार्गासाठी लावलेल्या पत्र्यावर आदळून अपघात

कणकवली : मुंबई - गोवा महामार्गावर चौपदरीकरणाच्या परिवर्तित मार्गासाठी लावलेल्या पत्र्याला दुचाकीची धडक बसून कलमठ येथील बाबाजी उर्फ बाळा नांदगावकर (वय २७ ) हा युवक ठार झाला .हा अपघात मंगळवारी रात्री जानवली - बौद्धवाडी येथे महामार्गावर घडला .अपघातानंतर एका तीन आसनी रिक्षातून बाबाजी याला उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले . मात्र , त्याला गंभीर दुखापत झाल्याने अधिक उपचारासाठी त्याला पडवे येथील लाईफटाईम हॉस्पिटलला नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला .बाबाजी हा जानवलीहून कलमठकडे घराच्या दिशेने येत असताना महामार्गावर बौद्धवाडी येथे ओढ्यालगत लावलेल्या पत्र्याला त्याच्या दुचाकीची धडक बसली . ही धडक एवढी जोरात होती की , यात बाबाजी तेथील ओहोळात फेकला गेला . या अपघातामुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय  

मागील कित्येक दिवस जानवली बौद्धवाडी येथे महामार्गावरील वाहतूक एकाच मार्गाने वळविण्यात आली आहे . त्यामुळे या ठिकाणी अनेक अपघात होऊन सुद्धा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनीला जाग येत नसल्याने प्रशासन अजून किती बळींची वाट पाहणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.बाबाजी याच्या पश्चात आई , वडील , भाऊ , बहीण असा परिवार आहे. अपघाताची माहिती समजताच मंगळवारी रात्री भाजपाचे युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदीप मेस्त्री , गुरुनाथ वर्देकर , सुरेश वर्देकर यांच्यासह ग्रामस्थांनी रुग्णालयात धाव घेतली . तसेच बाबाजी याला पडवे येथील रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली. 

टॅग्स :Accidentअपघातhighwayमहामार्गKankavli Police Stationकणकवली पोलिस स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग