शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
3
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला पूर्ण; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
4
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
5
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
6
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
7
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
8
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
9
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
10
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
11
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
12
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
13
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
14
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
15
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
16
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
17
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
18
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
19
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
20
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात मॅटवरील कबड्डी स्पर्धा सुरू

By admin | Updated: November 9, 2014 23:33 IST

पहिल्याच स्पर्धा : कालभैव मंदिर परिसरात कबड्डीप्रेमींची मोठी गर्दी

चिपळूण : संघर्ष क्रीडा मंडळ व जुना कालभैरव देवस्थान ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मॅटवरील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन काल (शनिवारी) सायंकाळी उत्साही वातावरणात करण्यात आले. या कबड्डी स्पर्धा कालभैरव मंदिरच्या प्रांगणात सुरेश शेट्ये क्रीडा नगरीत होत आहेत. स्पर्धेचे उद्घाटन लोकमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पटवर्धन यांच्या हस्ते झाले. क्रीडानगरीचे उद्घाटन माजी आमदार रमेश कदम, राजेश कदम आदींच्या उपस्थितीत झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम, राष्ट्रवादी काँगे्रसचे शहराध्यक्ष श्रीकृष्ण खेडेकर, कालभैरव देवस्थान प्रतिष्ठानचे विश्वस्त समीर शेट्ये, पंकज कोळवणकर, नयन साडविलकर, भाऊ पवार, संघर्ष क्रीडा मंडळाचे अध्यक्ष भाऊ काटदरे, चंद्रशेखर लाड, नगरसेवक मिलिंद कापडी, सुचय रेडीज, रामदास सावंत, नगर परिषदेच्या आरोग्य समिती सभापती आदिती देशपांडे, चिपळूण अर्बन बँकेचे संचालक बाबू तांबे, डॉ. दीपक विखारे, बाबुराव खातू, रवी लवेकर यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. पहिला सामना संघर्ष क्रीडा मंडळ, चिपळूण विरुद्ध दसपटी क्रीडा मंडळ या संघात झाला. मध्यंतराच्या सामन्यापर्यंत संघर्ष क्रीडा मंडळाला २० गुण, तर दसपटी क्रीडा मंडळाला १५ गुण मिळाले होते. ५ गुणांच्या आघाडीवर यजमान संघर्ष क्रीडा संघ खेळत होता. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात दसपटीचा प्रांजल पवार याने उत्कृष्ट चढाई करुन सामना आपल्या बाजूने फिरविला. संघर्ष क्रीडा मंडळाच्या योगेश कांबळेनेही संघाला विजयी होण्यासाठी चांगली पकड केली. मात्र, शेवटच्या ५ मिनिटात अत्यंत चुरशीची चढाई होऊन दसपटी क्रीडा मंडळाने ४१ गुण, तर संघर्ष क्रीडा मंडळाने २५ गुण मिळविले. १६ गुणांची आघाडी घेऊन दसपटीने पहिल्या राऊंडमध्ये आपल्या विजयाची छाप पाडली होती. या स्पर्धेमध्ये पुणेरी पलटण या संघात कबड्डी प्रो स्पर्धेत खेळणारा स्वप्नील शिंदे याने उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडविले. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील एकूण आठ संघांनी सहभाग दर्शविला आहे. बक्षीस वितरण कार्यक्रम दि. १० रोजी सायंकाळी उशिरा होणार आहे. चिपळूण येथे प्रथमच जिल्हास्तरीय मॅटवरील क्रीडा स्पर्धा होत असल्याने ही क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी क्रीडा रसिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. क्रीडांगणाच्या तिन्ही बाजूला भव्य गॅलरी उभारण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत या स्पर्धा प्रकाशझोतात साखळी पद्धतीने खेळविल्या जात आहेत. (वार्ताहर)