जोझिंदरचे प्राध्यापक युवतीशी अर्थिक संबंध, घरात सापडली चिठ्ठी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 23:01 IST2017-09-22T23:01:00+5:302017-09-22T23:01:37+5:30

आंबोलीत गळफास घेऊन आत्महत्या केलेला युवक जेझिंदर बलदेवसिंग विर्क याने अपहरण केलेली प्राध्यापिका दिलप्रीत कौर ही पंजाबमधील व्यास येथे कारमध्ये बसलेली शेवटची दिसली आहे. त्याचे सीसीटीव्ही फुटेज पंजाब पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. त्यानंतर आंबोलीपर्यंत ती दिसलीच नाही, असे पंजाब पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Jozindar's professor financial relationship with the young woman, found in the house | जोझिंदरचे प्राध्यापक युवतीशी अर्थिक संबंध, घरात सापडली चिठ्ठी 

जोझिंदरचे प्राध्यापक युवतीशी अर्थिक संबंध, घरात सापडली चिठ्ठी 

- अनंत जाधव
सावंतवाडी, दि. २२ - आंबोलीत गळफास घेऊन आत्महत्या केलेला युवक जेझिंदर बलदेवसिंग विर्क याने अपहरण केलेली प्राध्यापिका दिलप्रीत कौर ही पंजाबमधील व्यास येथे कारमध्ये बसलेली शेवटची दिसली आहे. त्याचे सीसीटीव्ही फुटेज पंजाब पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. त्यानंतर आंबोलीपर्यंत ती दिसलीच नाही, असे पंजाब पोलिसांनी स्पष्ट केले आहे. जेझिंदर याचे दिलप्रीत हिच्याशी काही आर्थिक व्यवहार होते. तशी चिठ्ठीही तिने आपल्या घरात लिहून ठेवल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. त्यामुळे या तपासामागचा गुंता वाढत चालला आहे. तसेच जेझिंदर हा ड्रग्स तस्करीत असल्याचेही पोलिसांनी मान्य केले आहे. त्याच्यावर पंजाबमध्ये गुन्हाही दाखल आहे. त्यामुळेच पंजाब पोलिसांनी जेझिंदर याच्या घरावर छापेमारी केली आहे.
आंबोली येथील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या जेझिंदर विर्क याच्याबाबत आता नवनवे खुलासे होऊ लागले आहेत. पंजाब पोलिसांचे पथक नातेवाईकांसह पुन्हा एकदा सावंतवाडीत दाखल झाले असून, त्यांनी या घटनेची विस्तृत माहिती घेतली. तसेच पोलिसांचे जाबजाबब व पंजाबहून आलेल्या नातेवाईकांचे जबाब नोंदवले आहेत. जेझिंदर याची गेल्या वर्षभरातील माहिती पोलिसांनी गोळा केली आहे. यात जेझिंदर याचे प्राध्यापिका दिलप्रीत हिच्याशी संभाषण आढळून येत आहे.
मात्र, ११ सप्टेंबरला प्राध्यापिका दिलप्रीत ही जेझिंदर याच्याबरोबर घरातून निघून जाण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. ती पोलिसांनी जप्त केली. त्यात ‘मी जेझिंदर याच्याशी जात आहे. आमचे दोघांचे आर्थिक व्यवहार आहेत. मात्र, माझ्या जीवाला काही बरे वाईट झाल्यास जेझिंदर यालाच जबाबदार धरावे, असे तिने चिठ्ठीत म्हटले आहे. तर १४ सप्टेंबरला पंजाब पोलिसांत सुरजित सिंग ब्रा नावाच्या व्यक्तीने एक तक्रार दिली. त्यात दिलप्रीत हिचे जेझिंदर विर्क याने तीन लाखासाठी अपहरण केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पंजाब पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. त्यात जेझिंदर हा जी कार घेऊन निघाला तिची सर्व माहिती गोळा केली. त्यात पंजाबपासून व्यासपर्यंत दिलप्रीत ही जेझिंदरबरोबर होती. तेथून पुढच्या प्रवासाला निघताना दिलप्रीत नसल्याने गूढ वाढले आहे. दिलप्रीत ही जेझिंदरच्या कारमध्ये बसलेली असल्याचे सीसीटीव्ही फुटेज व्यास शहरातील एटीएमच्या बाहेरून मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे.
पंजाब पोलीस आपल्या मागावर आहेत, याची माहिती जेझिंदर याला मिळाल्याने तो घाबरला होता. त्यातच तो ज्या मार्गाने चालला होता त्याची सर्व माहिती पंजाब पोलिसांकडे होती. त्यामुळे पंजाब पोलिसांनी घटनेच्या आदल्या दिवशी आंबोली येथे त्याची गाडी थांबवून ठेवावी, असे सांगितले होते. पण तत्पूर्वीच त्याने आत्महत्या केली. पंजाब पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार दिलप्रीत हिचे तीन लाखासाठी अपहरण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, व्यासनंतर दिलप्रीत कुठे दिसलीच नाही. मग जेझिंदरने दिलप्रीतचे काय केले, याचे गूढ वाढले आहे.
जेझिंदर हा ड्रग्स तस्कर होता. त्याच्यावर पंजाबमध्ये गुन्हे दाखल आहेत. तो गेल्या वर्षभरात गोव्यात आला नाही. मात्र तत्पूर्वी तो आला का, याची माहिती पंजाब पोलिसांकडे नाही. तसेच पंजाब पोलिसांनी जेझिंदर याच्या घरावरही छापे टाकले. मात्र त्यातही आक्षेपार्ह असे काही आढळले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कारमध्ये सापडलेली नशेची इंजेक्शन तसेच अन्य साहित्य हे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे, असे पोलिसांनी जाहीर केले आहे.
दरम्यान, जेझिंदर याचे वडील पंजाबच्या राज्यपालांच्या गाडीवर चालक होते. ते आता निवृत्त झाले आहेत. तर एक भाऊ आॅस्ट्रेलियाला असतो, असे सांगण्यात येत आहे. जेझिंदरचे मित्र तसेच शेजारी गुरूवारी रात्री उशिरा सावंतवाडीत दाखल झाले. तर शुक्रवारी पंजाब पोलीस आले. त्यांनी नातेवाईकांकडून जेझिंदरबाबत माहिती घेतली आहे. मात्र नातेवाईकांकडून विस्तृत अशी माहिती देण्यात आली नाही.
 
प्राध्यपिकेबाबत अद्याप माहिती मिळाली नाही : पंजाब पोलीस
जेझिंदर याच्यासोबत आलेली प्राध्यापिका दिलप्रीत कौरबाबत अद्यापपर्यंत आम्हाला माहिती मिळाली नाही. पंजाबमधील व्यास येथे ती शेवटची दिसली. तेथून ती दिसली नाही. आम्ही तपास करीत आहोत. जेझिंदर ज्या मार्गाने आला, त्या मार्गावरचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जातील, असे यावेळी पंजाबचे पोलीस अधिकारी प्रवेश चोपडा यांनी सांगितले. तसेच हा युवक ड्रग्स तस्कर होता. त्याच्यावर गुन्हे दाखल असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 

Web Title: Jozindar's professor financial relationship with the young woman, found in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा